Covacin is more expensive than Covishield; Bharat Biotech's covacin rates are now fixed following Serum Institute's covshield

१ मे पासून कोविन पोर्टलवर कोरोना लसीचा प्रकार आणि त्याची किंमत याची माहितीही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. खासगी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नोंदणी करतेवेळी नागरिकांना पसंतीची लसही निवडता येणार आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना २८ एप्रिलपासून कोविन पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.

    दिल्ली : १ मे पासून कोविन पोर्टलवर कोरोना लसीचा प्रकार आणि त्याची किंमत याची माहितीही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. खासगी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नोंदणी करतेवेळी नागरिकांना पसंतीची लसही निवडता येणार आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना २८ एप्रिलपासून कोविन पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.

    या वयोगटातील लोकांना जर खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यावयाची असेल तर त्यांना त्याची किंमत द्यावी लागेल. ४५ वर्षावरील सर्व वयोगटातील व्यक्ती राज्य व केंद्रशासित राज्यातील सरकारी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी पात्र ठरतील.

    केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात राज्य व केंद्रशासित राज्यांना पत्र लिहिले आहेत. प्र्तयेक खासगी लसीकरण केंद्रावर एक मेपासून सुरू होत असलेल्या लसीकरण मोहिमेबाबत कोविन पोर्टलवर लसीचा प्रकार, त्याची किंमत आणि उपलब्ध लसींची संख्या याबाबत माहिती देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी म्हटले.