tanishq diwali advetisment

तनिष्कच्या नवीन जाहिरातीत महिला आपल्या दिवाळीच्या प्लान्सविषयी बोलत आहेत. दरम्यान, त्या फटाके बंदीविषयी बोलतात आणि समजवतात की कसा हा सण कुटुंबाच्या सोबत राहण्यात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासंबंधात आहे. याबाबत अनेक युजर्सनी कंपनीवर धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण केल्याचा आरोप लावला आहे.

दिल्ली : दिवाळीतील नव्या जाहिरातीमुळे ‘तनिष्क’ (Tanishq ) जाहीरात ( Tanishq Diwali advertisement)  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महिन्याभरापूर्वी या कंपनीने आंतरधर्मीय विवाहासंदर्भात एक जाहिरात केली होती. त्यावर जोरदार विरोध केला जात होता. तनिष्कने केलेली तनिष्क” च्या नवीन जाहिरात लव्ह-जिहादचे समर्थन करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त केलेल्या जाहिरातीवर टीका केली जात आहे. आता कंपनीने ‘एकत्वम’ नावाने एक नवीन कलेक्शन लॉन्च केले आहे. या जाहिरातीत त्यांनी फटाके बंदीचे समर्थन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका केली जात आहे. या जाहिरातीत नीना गुप्ता, सयानी गुप्ता, निमरत कौर, अलाया ‘एफ दिसत आहे आणि ती दिवाळीविषयी चर्चा करीत आहेत. या ट्रोलिंगनंतर तनिष्कने आपल्याट्विटर हँडलवरून ट्विट डिलीट केले आहे.

काय आहे तनिष्कच्या जाहिरातीत