दहावी आणि बारावी CBSE बोर्ड परीक्षा दोन टर्ममध्ये; अभ्यासक्रमातही होणार बदल

सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 मध्ये दोन टप्प्यात घेतली जाणार आहे(CBSE board exams). पहिली टर्म नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये तर टर्म दोनची परीक्षा मार्च ते एप्रिल 2022 दरम्यान घेतली जाणार आहे. सीबीएसईने यंदा परीक्षा सेमिस्टर पद्धतीप्रमाणे दोन टप्प्यांत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

    दिल्ली : सीबीएसई दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2022 मध्ये दोन टप्प्यात घेतली जाणार आहे(CBSE board exams). पहिली टर्म नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये तर टर्म दोनची परीक्षा मार्च ते एप्रिल 2022 दरम्यान घेतली जाणार आहे. सीबीएसईने यंदा परीक्षा सेमिस्टर पद्धतीप्रमाणे दोन टप्प्यांत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

    पहिली टर्म परीक्षा 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान, तर दुसरी टर्म परीक्षा पुढील वर्षी मार्च-एप्रिल 2022 मध्ये होणार आहे. लवकरच याचे वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे. या दोन टप्प्यांत होणाऱ्या परीक्षांसाठी अभ्यासक्रमही दोन भागांत विभागला जाणार आहे. दोन्ही परीक्षांचे गुण एकत्र करून अंतिम निकाल तयार केला जाईल.

    शाळा आता सुरू होत आहेत. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थित सुरू झाल्या, तर पहिल्या टर्ममधील गुणांचे मूल्य कमी केले जाईल आणि दुसऱ्या टर्मच्या गुणांचे वेटेज वाढवले जाईल. शाळा बंदच राहिल्या, तर मात्र अंतर्गत मूल्यांकन, प्रात्यक्षिक प्रकल्प आणि थिअरी विषयांत विद्यार्थ्याने मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल तयार केला जाईल आणि दोन्ही टर्म परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घरातूनच होतील. पहिल्या टर्मसाठी शाळाच प्रॅक्टिकल परीक्षा घेईल. त्यामुळेच परीक्षा पद्धतीप्रमाणेच अभ्यासक्रमातही बदल करण्यात आला असून तो कमी करण्यात आला आहे.