दहशतवाद्यांचा पोलीसांच्या ताफ्यावर हल्ला, २ पोलीस शहीद

दहशतवादी हल्ल्यातील जखमींना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर पोलीसांनी नवागाम परिसरात दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे.

श्रीनगर :  जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पोलीसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. नवागाम येथे पोलीसांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत. तसेच ३ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. 

दहशतवादी हल्ल्यातील जखमींना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर पोलीसांनी नवागाम परिसरात दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे. काश्मीर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नवागाम येथील बायपासजवळ नाकाबंदीच्या वेळी दहशतवाद्यांनी पोलीसांवर गोळीबार केला. याच गोळीबारामध्ये ३ पोलीस जखमी झाले आहेत.