दहशतवाद पोसणाऱ्यांचे धाबे दणाणले; जम्मू कश्मीरसह बंगळुरुत एनआयएचे छापे

  •  टेरर फंडिगविरोधात कारवाई

दिल्ली. टेरर फंडिगविरोधात राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने जम्मू कश्मीरमध्ये एकाचवेळी १० ठिकाणी छापा टाकला आहे. स्वयंसेवी संस्थाद्वारे (एनजीओ) जम्मू कश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसे पोहचवण्यात येत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. श्रीनगरमधील ९ तर बंदीपेरातील एका ठिकाणी एनआयएने छापा टाकला आहे. तसेच बंगळुरुतही छापा टाकण्यात आला आहे. पत्रकार आणि स्वयंसेवी संस्थावर हे छापे टाकण्यात आले आहेत.

एनजीओवर संशय
एनजीओद्वारे दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या संशयावरून एनआयने केलेली ही मोठी कारवाई आहे. परदेशातून दहशतवाद्यांना एनजीओद्वारे टेरर फंडिग करण्यात येत असल्याची माहिती एनआयला मिळाली होती. त्याआधारे ही कारवाई करण्यात येत आहे.जम्मू कश्मीर आणि बंगळुरूसह १० ठिकाणी एनआयएने छापे टाकले. या प्रकरणी एनआयएने यूएपीए कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. कश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी आणि फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देश परदेशातून निधी जमवून दहशतवाद्यांना पुरवठा करणाऱ्या एनजीओवर छापे टाकण्यात आले आहेत.

मानवाधिकार कार्यकर्तेही रडारवर

व्यापार,धार्मिक कामे, सामाजिक कामे यासाठी पैसे जमवून त्याचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी करण्यात येत होता. हवालाद्वारे हे पैसे भारतात येत असल्याची माहितीही मिळाली आहे. या प्रकरणी एनआयए एनजीओच्या दस्तावेजांची तपासणी करत आहे. छापे टाकण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते आणि समाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ते टेरर फंडिग करणाऱ्या एनजीओशी संबधित असल्याचा संशय आहे. हे एनजीओ परदेशातून निधी जमवून कश्मीरमधील युवकांना दहशतवादाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याची माहितीही मिळाली आहे.

हाफिजच्या एनजीओने खरेदी केली जमीन
मुंबईतील २६/ ११ हल्ल्याचा मास्टरमाइंडहाफीज सईदची एनजीओ फलह ए इन्सानियतने जम्मू कश्मीरमध्ये पाठवलेल्या पैशांनी काही जणांनी जमीन आणि मालमत्ता खरेदी केल्याची महिती मिळाली आहे. या मालमत्ता विविध शहरात खरेदी करण्यात आल्या आहेत. एनआयए याबाबतचे पुरावे जमा करत आहे. टेरर फंडिगप्रकरणी एनआयएने केलेली ही मोठी कारवाई आहे.

NIA भाजपची पाळीव बनली आहे

जे लोक रांगेत उभे राहण्यास नकार देतात अशा लोकांना घाबरवणे आणि धमकावण्यासाठी एनआयए ही संस्था भारतीय जनता पक्षाची पाळीव बनली आहे, असा शब्दांत मेहबूबा यांनी टीकास्त्र सोडले आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असंतोषावर भारत सरकारच्या दोषपूर्ण कारवाईचे आणखी एक उदाहरण आहे, असे ट्वीट मेहबुबा मुफ्तींनी केले.

- मेहबूबा मुफ्ती