शेतकरी आंदोलक आक्रमक; पंजाब , हरियाणात टोल घेण्यास केला मज्जाव

आंदोलनाची वाढती दाहकता लक्षात घेत फरीदाबाद पोलिसांनी दिल्ली-हरियाणाच्या मार्गावर येणारे ५ टोल प्लाझावर ३५०० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. बदारपुर, गुरुग्राम , फरिदाबाद, कुंडली गाजियाबाद -पलवल पाली क्रशर झोन व धौजटोल प्लाझावरील शेतकरी आंदोलकानावर नजर ठेवली जात आहे.

 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आपले आंदोलन अधिक धारदार केले आहे. शेतकऱ्यांनी  हरियाणा व पंजाबमध्ये टोल फ्री केले आहेत टोल कर्मचाऱ्यांना नागरिकांकडूनं कर वसुली करण्यास अडथळा निर्माण केला जात आहे. तरा जालंदरमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थानात शीख तालमेल कमेटी ने रिलायन्सचे शोरूम बंद केलं आहे . शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये १ ऑक्टोंबर पासून कर वसूल केला जात नाही. टोल वसुली होत नसल्याने सरकारचे प्रत्येक दिवसाचे ३ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. पंजाब नॅशनल महामार्गावर एकूण २५ टोल आहेत.

पोलिसांची आंदोलकांवर नजर

आंदोलनाची वाढती दाहकता लक्षात घेत फरीदाबाद पोलिसांनी दिल्ली-हरियाणाच्या मार्गावर येणारे ५ टोल प्लाझावर ३५०० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. बदारपुर, गुरुग्राम , फरिदाबाद, कुंडली गाजियाबाद -पलवल पाली क्रशर झोन व धौजटोल प्लाझावरील शेतकरी आंदोलकानावर नजर ठेवली जात आहे.शेतकरी  पोलिसांच्या म्हणण्यांनुसार आम्ही सगळ्यांचा सन्मान करतो,परंतु कायदा व्यवस्था बिघडवण्याचे काम केल्यास कडक कारवाई केली जाईल.

देश विरोधी कृत्यांना थारा नाही
शेतकरी आंदोलनात देश विरोधी लोक घुसल्याच्या सरकारच्या आरोपावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी इंटेलीजेंस लावून त्यांना पकडा. जर बंदी असलेल्यासंघटना आमच्या आंदोलनात घुसल्या असतीलतर त्यांना पकडून जेलमध्ये घातले पाहिजे. आम्हाला आतापर्यंत असे कोणी आढळून आले नाही, आढळल्यास त्यांना बाहेर काढूया असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐका
शेतकऱ्यांच्या समस्या व मागण्यांवर सरकारने ऐकल्या पाहिजेत . मात्र या सरकार शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठीपेक्षा त्यांच्यावरच दाबावा आणताना दिसून येत असल्याचे मत शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखाबीर सिंह बादल यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी आंदोलनाचा आजचा १७ दिवस आहे.