आंदोलक शेतकरी नेते केंद्र सरकारसोबतच्या चर्चेसाठी विज्ञान भवनाकडे रवाना

सरकारने तयार केलेले तीन कृषीविषयक कायदे रद्द करण्यासाठी पंजाब हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले आहे. मागील दहा पासून दिल्लीतील सिंघूर सीमेवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे.

  • आजच्या पाचव्या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : केंद्र सरकारबरोबर कृषीविषयक कायदेरद्द करण्यासाठीच्या पाचव्या बैठकीसाठी आंदोलक शेतकरी नेत्याची (farmer leader)टीम विज्ञान भवनाकडे (Vigyan Bhawan) रवाना झाली आहे. आज होणाऱ्या बैठकीकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र सरकारसोबत आंदोलक शेतकऱ्यांच्या बैठकही सुरू आहेत. आतापर्यंत शेतकरी व सरकार यांच्यात चार बैठका झाला मात्र त्यातून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. सरकारने तयार केलेले तीन कृषीविषयक कायदे रद्द करण्यासाठी पंजाब हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले आहे. मागील दहा पासून दिल्लीतील सिंघूर सीमेवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे.

कृषी क्षेत्र अधिक खुले करण्याचा दावा करत केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे (farm laws)केले. या कायद्यांना शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. आधी राज्याराज्यात शेतकऱ्यांनी आंदोलनं सुरू केली. मात्र, सरकारकडून दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती. दिल्लीत आंदोलनासाठी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.