मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पाठींबा

मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू; शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम

नवी दिल्ली : राजधानीतील कडाक्याच्या थंडीतही सलग ९ दिवशीही कृषीकायदे( Farmer Low )मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होता नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे . आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमेवरील ९ पो पॉईंटवरील वाहतुक थांबवण्यात आली आहे. आंदोलन सुरू झाल्यापासून शेतकरी आंदोलक व केंद्र सरकारमध्ये तोडगा काढण्यासाठी सातत्याने बैठका सुरू आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकाराचा तोडगा निघाला नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.

उद्या ५ तारखेला पाचवा बैठकीचा राऊंड केंद्र व सरकार यांच्यात होणार आहे. केंद्र सरकार ( central Government )कृषी कायद्यात काही सुधारणा करण्यास तयार आहे, परंतु आंदोलक शेतकऱ्यांकडून या कृषी कायदे रद्द करण्यांची मागणी केली जात असल्याची माहिती क्रांतीकारी किसान युनियन संघटनेचे प्रमुख दर्शनपाल यांनी दिली आहे.