कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांच्या शरीरात तयार होणाऱ्या अ‍ॅंटीबॉडी टिकतात इतक्या दिवस

रॉकफेलर यूनिव्हर्सिटी आणि न्यूयॉर्कच्या वेइन कॉर्नेल मेडिसिनच्या टिमच्या रिसर्चनुसार बरे झाल्यावर लोकांच्या शरीरात अ‍ॅंटीबॉडी आणि इम्यून मेमरी साधारण ६ महिने ते १ वर्षापर्यंत कायम राहू शकते.

    नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वैद्यकीय तज्ज्ञाकडून व्यक्त केला जात आहे. या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी वैद्यकीय तज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न असतानाच संशोधनातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे.

    ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या शरीरात कोरोना लसीशिवायही एक वर्षापर्यंत अँटीबॉडी तयार होतात त्यामुळे त्या लोकांची प्रतिकारशक्ती व्हायरस विरोधात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर आले आहे रॉकफेलर यूनिव्हर्सिटी आणि न्यूयॉर्कच्या वेइन कॉर्नेल मेडिसिनच्या टिमच्या रिसर्चनुसार बरे झाल्यावर लोकांच्या शरीरात अ‍ॅंटीबॉडी आणि इम्यून मेमरी साधारण ६ महिने ते १ वर्षापर्यंत कायम राहू शकते.
    कोरोनाच्या संक्रमणातून बरे झालेले लोक कोरोनाची लस घेतात त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती आश्चर्यकारकपणे वाढते. त्यामुळे कोरोनाच्या कितीही घातक व्हेरिएंटला हरवण्यात यश मिळू शकतं, असं रिसर्चमधून समोर आलं आहे.