सीबीएसई बारावी निकालासाठी मूल्यांकन फॉर्म्युला उद्या जाहीर होणार

सीबीएसईच्या वतीने वस्तुनिष्ठ निकष ठरवण्यासाठी सीबीएसईने 12 सदस्यांची समिती गठीत केली होती. ही समिती उद्या आपला अहवाल सादर करेल. समिती उद्या हा अहवाल सादर करेल.

    नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेल्या सीबीएसई 12 वी परीक्षा 2021 (CBSE Board 12th Result 2021) च्या निकालाचा मूल्यांकन फॉर्म्युला उद्या जाहीर करण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, परंतु मूल्यमापन करण्याची पद्धत काय असेल याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात बरेच प्रश्न आहेत. या संदर्भात उद्या सीबीएसई अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

    उद्या महत्त्वाची घोषणा

    सीबीएसईच्या वतीने वस्तुनिष्ठ निकष ठरवण्यासाठी सीबीएसईने 12 सदस्यांची समिती गठीत केली होती. ही समिती उद्या आपला अहवाल सादर करेल. समिती उद्या हा अहवाल सादर करेल.

    ही बाब यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात गेली आहे, म्हणून उद्या आपण प्रथम सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊ. यानंतर सीबीएसई निकाल जाहीर करेल, अशी माहिती सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली. तत्पूर्वी निकाल कोणत्या आधारावर जाहीर केला जाईल, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय.