उद्या पृथ्वीच्या जवळून जाणार लघुग्रह, नासाने दिला इशारा

दिल्ली - जगभरासह देशात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच चक्रीवादळाने महाराष्ट्रात कहर केला. आता आणखी एक संकट पृथ्वीवर येणार असल्याचा इशारा नासाकडून देण्यात आला आहे. अमेरिकेमधील अंतराळ

 दिल्ली – जगभरासह देशात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच चक्रीवादळाने महाराष्ट्रात कहर केला. आता आणखी एक संकट पृथ्वीवर येणार असल्याचा इशारा नासाकडून देण्यात आला आहे. अमेरिकेमधील अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने पृथ्वीसाठी धोकादायक असणारा अ‍ॅस्टेरॉईड हा लघुग्रह पृथ्वी जवळून जाणार असल्याचा इशारा दिला आहे. नासानेच आपल्या वेबसाईटवरून असे सांगितले की, ६ जून रोजी हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. या लघुग्रहाचे नाव ‘२००२ एनएच फोर’ असे असल्याचे नासाच्या वेबसाईटवर म्हटले आहे. हा लघूग्रहाचा व्यास २५० ते ५७० मीटर इतका असल्याचे देखील नासाकडून सांगण्यात आले आहे.

२०,००० किमी प्रती तास वेगाने प्रवास

नासाने दिलेल्या माहितीनुसार, हा लघुग्रह ६ जून रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणार आहे. ‘२००२ एनएच फोर’ हा लघुग्रह पृथ्वीपासून ५.१ दशलक्ष किमी अंतरावरून जाणार असल्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे. माहितीनुसार, शनिवारी ६ जून रोजी एका मैदानाएवढ्या आकाराचा हा विशाल लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. संशोधकांचा दावा आहे की, यामुळे पृथ्वीला कुठलाही धोका नाही. नासा ने याला ‘नियर अर्थ ऑब्‍जेक्‍ट्स’ च्या यादीत ठेवले आहे. हा लघुग्रह २०,००० किमी प्रती तास वेगाने प्रवास करत आहे. हा लघुग्रह ज्यावेळी पृथ्‍वीला क्रॉस करेल त्यावेळी खूप जास्त दूर असेल असे सांगण्यात आले आहे. नासाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीजवळून जाताना या लघुग्रहाचा वेग ११.१० किमी प्रती सेकंद इतका असणार आहे.