ऐकावं ते नवलच! टीम बनवून पक्ष्यांनी खेळला व्हॉलीबॉल

कधी कधी पशुपक्ष्यांकडूनही काही खेळ खेळवले जात असतात. एका सशाने तर बास्केटबॉल (Basketball) खेळण्यात विक्रमही केला होता. आता छोट्या पोपटांचा एक व्हीडिओ सोशल मीडियात (Viral On Social Media)  व्हायरल होत आहे. त्यामध्ये या पक्ष्यांनी दोन संघ बनवून व्हॉलीबॉल कसा खेळला हे दर्शवले आहे. दोन वेगवेगळ्या रंगांचे हे पक्षी दोन टीमचा भाग होते.

दिल्ली – कधी कधी पशुपक्ष्यांकडूनही काही खेळ खेळवले जात असतात. एका सशाने तर बास्केटबॉल (Basketball) खेळण्यात विक्रमही केला होता. आता छोट्या पोपटांचा एक व्हीडिओ सोशल मीडियात (Viral On Social Media)  व्हायरल होत आहे. त्यामध्ये या पक्ष्यांनी दोन संघ बनवून व्हॉलीबॉल कसा खेळला हे दर्शवले आहे. दोन वेगवेगळ्या रंगांचे हे पक्षी दोन टीमचा भाग होते. एका संघात हिरव्या रंगाचे तर एका संघात पिवळ्या रंगाचे पक्षी होते. ते चोचीने एक छोटा व मऊ चेंडू पकडून जाळीच्या पलीकडे टाकत होते.

जाळीपलीकडून चेंडू आला की लगेच ते चोचीत धरून पुन्हा जाळीच्या पलीकडे टाकत. कधी कधी जाळीवर दोन्हीकडील पक्ष्यांची चोचीत चेंडू धरून ढकलाढकलीही होत असे! हा व्हीडिओ एका ट्विटर यूजरने शेअर केला असून त्याला आतापर्यंत तीन हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यावर लाईक्स आणि कमेंटस्चा वर्षावही होत आहे. हे चिमुरडे आणि चपळ पक्षी अतिशय सुंदररीत्या हा खेळ खेळत असताना दिसून येतात.