अन्नदाता मरत आहे…  म्हणत ‘या’ खासदाराने पंतप्रधान मोदीसमोर केला कृषी कायद्यांचा निषेध

खासदार संजय सिंग, दिल्ली विधानसभेचे सदस्य परलादसिंग सोहने यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातील 'हे काळे कायदे मागे घ्या ... 'लाखो शेतकरी थंडीत मरत आहे' , 'अन्नदाता मरत आहे' 'शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणे बंद करा' तसंच एम एस पीची गॅरंटी दया, अशा घोषणा देत ,पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी संसदेत आल्यानंतर आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग, दिल्ली विधानसभेचे सदस्य परलादसिंग सोहने यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातील ‘हे काळे कायदे मागे घ्या … ‘लाखो शेतकरी थंडीत मरत आहे’ , ‘अन्नदाता मरत आहे’ ‘शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणे बंद करा’ तसंच एम एस पीची गॅरंटी दया, अशा घोषणा देत ,पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याबरोबर संजय सिंग यांनी फलक दाखवून केंद्रमी सरकारच्या कृषी कायद्यांचा निषेधही केला. केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हडिओ कॉन्फरस द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला.