gold mortgage

पोलिसांनी चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश करून 6 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या चोरांकडून 6.55 कोटीचे सोन्याचे दागिने, सव्वा आठ कोटीचे सामान आणि 57 लाख रोकड जप्त केली आहे. ही घटना नोएडा सेक्टर 39 मधील आहे. पोलिसांना अशी माहिती मिळाली की काही संशयित सदरपूर सोम बाजाराजवळ उभा आहेत. त्यांच्याकडे करोडो रुपयांचे सोने आहे. पोलिसांनी तत्काळ याठिकाणी धाव घेत राजन भाटी आणि अरुण नावाच्या दोघांना ताब्यात घेतले.

    दिल्ली : पोलिसांनी चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश करून 6 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या चोरांकडून 6.55 कोटीचे सोन्याचे दागिने, सव्वा आठ कोटीचे सामान आणि 57 लाख रोकड जप्त केली आहे. ही घटना नोएडा सेक्टर 39 मधील आहे. पोलिसांना अशी माहिती मिळाली की काही संशयित सदरपूर सोम बाजाराजवळ उभा आहेत. त्यांच्याकडे करोडो रुपयांचे सोने आहे. पोलिसांनी तत्काळ याठिकाणी धाव घेत राजन भाटी आणि अरुण नावाच्या दोघांना ताब्यात घेतले.

    6.55 कोटींचा ऐवज चोरला

    पोलिसांनी त्यांच्याकडून 1-1 किलो सोन्याचे बिस्किट आणि कॅश जप्त केला. चौकशीत त्यांनी आपल्या इतर सहा साथीदारांच्या नावाचाही खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ चोरांनी 23 सप्टेंबर 2020 ला सूरजपूरच्या सिल्वर सिटी सोसायटीमधील एका फ्लॅटमधून करोडो रुपयांचे सोने आणि रोकड चोरी केली होती. मात्र, दोन चोरांना पकडण्यात आल्यानंतर त्यांनी खुलासा केला असता पोलिसांनी सेक्टर 81 मधून जय सिंह, नीरज, अनिल आणि बिंटू शर्मा यांना अटक केली. या सर्व चोरांकडून पोलिसांनी 13.9 किलो सोने, 1 कोटी 10 लाख किमतीचे जमिनीचे कागदपत्र, 57 लाख रुपये कॅश जप्त केला. या सोन्याची किंमत बाजारात 6.55 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे 8.25 कोटी रुपयांचे सामान जप्त केले आहे. या सामानाच्या वाटण्यांवरून चोरांमध्ये भांडण झाले. यानंतर त्यांच्यातीलच एकाने पोलिसांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली.

    ‘त्या’ व्यक्तीच्या नावावरही अनेक गुन्हे

    पोलिसांचे असे म्हणणे आहे, की चोरांनी ज्याच्या घरावर दरोडा टाकला, त्या व्यक्तीच्या नावावरही अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. चौकशीनंतर त्या व्यक्तीलाही आरोपी घोषित करण्यात येईल. आरोपी स्वतः वकील असल्याचे सांगतो. पोलिसांचे म्हणणे आहे, की घरातून करोडोची चोरी होऊनही त्याने याची तक्रार केली नाही, कारण त्याच्या नावावरही अनेक तक्रारी आहेत.

    हे सुद्धा वाचा