कोरोना प्रतिबंधक लस साधारण फ्रीजमध्येही ठेवता येणार

अमेरिकेतील औषध निर्मिती कंपनी फायजरने भारतीयांसाठी एक दिलासादायक घोषणा केली आहे. देशातील जनतेसह संपूर्ण जगाला सध्या कोरोनावरील लसीची प्रतीक्षा आहे. अशातच, फायजर कंपनीची लस आता साधारण फ्रीजमध्येही ठेवता येणार आहे. साधारण फ्रीजमध्ये ठेवण्यायोग्य लसीचे नवे वर्जन फायजरकडून तयार केले जात आहे. फायजरने ब्रिटनमध्ये कोरोना लसीची चाचणी पूर्ण करून लसीकरणाला सुरुवात केली आहे. फायजरकडून आता भारतावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भारतात आपल्या लसीला आपात्कालीन मंजुरी मिळावी, यासाठी फायजरने नियामक मंडळाकडे अर्जही सादर केला आहे.

  • ‘फायजर’ कंपनीकडून भारतासाठी आनंदवार्ता

दिल्ली (Delhi).  अमेरिकेतील औषध निर्मिती कंपनी फायजरने भारतीयांसाठी एक दिलासादायक घोषणा केली आहे. देशातील जनतेसह संपूर्ण जगाला सध्या कोरोनावरील लसीची प्रतीक्षा आहे. अशातच, फायजर कंपनीची लस आता साधारण फ्रीजमध्येही ठेवता येणार आहे. साधारण फ्रीजमध्ये ठेवण्यायोग्य लसीचे नवे वर्जन फायजरकडून तयार केले जात आहे. फायजरने ब्रिटनमध्ये कोरोना लसीची चाचणी पूर्ण करून लसीकरणाला सुरुवात केली आहे. फायजरकडून आता भारतावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. भारतात आपल्या लसीला आपात्कालीन मंजुरी मिळावी, यासाठी फायजरने नियामक मंडळाकडे अर्जही सादर केला आहे.

उणे ७० अंश सेल्सियस तापमान आवश्यक
अमेरिकन कंपनी फायजरला आपली लस सुरक्षित ठेवण्यासाठी उणे 70 अंश सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते. भारतात मात्र एवढे कमी तापमान असलेली कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध नाही. या समस्येचा निपटारा करण्यासाठी कंपनी आपल्या लसीची नवी आवृत्ती तयार करीत आहे. फायजरचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी याबाबत सांगितले की, आमची कंपनी लसीच्या एका नव्या फॉर्म्युल्यावर काम करीत आहे. ही लस उणे 70 अंश सेल्सियस तापमानात स्टोअर करण्याची आवश्यकता नसेल. या लसीला सामान्य रेफ्रिजरेशनमध्येही ठेवता येईल. दरम्यान, कॅनडाच्या आरोग्य नियामक मंडळानेही फायजरच्या लसीला मंजुरी दिली आहे.