The corona vaccine will be followed by the malaria vaccine; One child dies every 30 seconds

मुंबई : कोरोना लस पाठोपाठ देशात लवकरच मलेरिया लस देखील येणार आहे. कोरोनावर मात करणारी लस विकसित करत असलेले ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील संशोधक मलेरियावर (हिवताप) मात करण्यासाठीही लस विकसित करत आहेत.
दरवर्षी जगात किमान १५ ते २० कोटी जणांना मलेरिया होतो. तर, दर ३० सेकंदाला एका मुलाचा मलेरियामुळे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती देखील सोमर आली आहे.

डासांच्या चावण्यामुळे मलेरिया हा आजार होतो. मलेरिया प्रामुख्याने आफ्रिका, आशिया तसेच दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण देशांमध्ये आढळतो. प्लास्मोडिअमच्या पी. फाल्सीपरम, पी. व्हिवॅक्स, पी. ओव्हल, पी. नाउल्स आणि पी. मलेरिए. एनोफिल्स या मादी डासांच्या चावण्याने मलेरियाचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करू शकतात.

दरवर्षी जगात किमान १५ ते २० कोटी जणांना मलेरिया होतो. यातील अनेकांचा आजार बरा होतो तर काहींचा यामुळे मृत्यू होतो. साधारणपणे दरवर्षी किमान ३ ते ५ लाख नागरिकांचा मलेरियामुळे मृत्यू होतो. युनिसेफच्या आकडेवारीनुसार दर ३० सेकंदाला एक या प्रमाणे दर दिवशी मलेरियामुळे तीन हजार मुलांचा मृत्यू होतो. मलेरियाची लस आल्यास हे मृत्यू झपाट्याने कमी करणे शक्य होईल. मलेरियाची लस यशस्वी झाल्यास २०२४ पासून संपूर्ण जगात ही लस मोठ्या प्रमाणावर वापरली जाणार आहे.

परिसर स्वच्छ ठेवला तसेच आसपास साठलेले पाणी नसेल तर मलेरियाचा धोका टाळता येतो. अनेक डास साठवलेल्या पाण्यावर पैदास करतात या नव्याने जन्मलेल्या डासांमुळे परिसरातील नागरिकांना मलेरियाचा धोका निर्माण होऊ शकतो. याच कारणामुळे मलेरिया टाळण्यासाठी स्वच्छता हा सर्वात प्रभावी उपाय समजला जातो.

दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्युटचे संशोधक मलेरिया या आजारावर मात करणारी लस विकसित करत आहेत. या लशीचे माणसांवरचे शेवटच्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल प्रगतीपथावर आहे. या टप्प्यात आफ्रिकेतील ४ हजार ८०० मुलांना मलेरियाची लस दिली जाणार आहे.