कोरोनाचा प्रभाव कमी झाला; 53% पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार

जूनमध्ये 76% पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला होता, जुलैमध्ये हे प्रमाण घटून 48% झाले व ऑगस्टमध्ये 44% झाले. ताज्या सर्व्हेक्षणत 53% पालक मुलांना शाळेत पाठवू इच्छित असल्याचे समोर आले आहे. तर 44% सध्या शाळा सुरू न करण्याच्या पक्षात आहेत. तसेच 89% पालकांना वाटते की स्थानिक प्रशासनाने शाळांच्या स्टाफसाठी शाळांजवळच लसीकरणाची सोय करावी व त्यांना लसीकरणात प्राथमिकता मिळावी. याशिवार 74% पालकांची इच्छा आहे की, प्रशासनाकडून अँटिजन टेस्ट किट योग्य प्रमाणात शाळांता पुरविण्यात यावी.

    दिल्ली : देशातील बहुतांशी राज्ये अगदी छोट्यातील छोट्या इयत्तेसाठीदेखील ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची घोषणा करीत आहेत, मात्र पालकांमध्ये कमी होत असलेला कोरोनाचा प्रभाव पाहता आता मुलांना शाळेत पाठविण्याची इच्छा दिसून येत आहे. लोकल सर्कल्सच्या ताज्या सर्व्हेक्षणात असे आढळून आले आहे की, मुलांना शाळेत पाठविण्यासाठीची पालकांची भुणभुण गेल्या तीन महिन्यांत सतत कमी होत आहे

    जूनमध्ये 76% पालकांचा शाळेत पाठविण्यास नकार

    जूनमध्ये 76% पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला होता, जुलैमध्ये हे प्रमाण घटून 48% झाले व ऑगस्टमध्ये 44% झाले. ताज्या सर्व्हेक्षणत 53% पालक मुलांना शाळेत पाठवू इच्छित असल्याचे समोर आले आहे. तर 44% सध्या शाळा सुरू न करण्याच्या पक्षात आहेत. तसेच 89% पालकांना वाटते की स्थानिक प्रशासनाने शाळांच्या स्टाफसाठी शाळांजवळच लसीकरणाची सोय करावी व त्यांना लसीकरणात प्राथमिकता मिळावी. याशिवार 74% पालकांची इच्छा आहे की, प्रशासनाकडून अँटिजन टेस्ट किट योग्य प्रमाणात शाळांता पुरविण्यात यावी.

    6 मुद्यांची अंमलबजावणी आवश्यक

    आंतरराष्ट्रीय पातळीवर महामारीचे तज्ज्ञांचा सल्ला आहे की, शाळांमध्ये सुरक्षित पद्धतीने अभ्यासाठी सहा मुद्यांवर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यात प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण, वर्गामध्ये खेळत्या हवेची सोय व एअर प्युरिफायर, केएन95 किंवा एन95 चा आवश्यक वापर, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून वर्गात बसणे, इनडोअर मोठ्या आयोजन टाळणे, कर्मचारी व विद्यार्थ्यांची वारंवार कोविड अँटिजन चाचणी यांचा समावेश आहे.