आसाम, बिहार, सिक्किम आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; पंतप्रधान मोदींनी दिले मदतीचं आश्वासन

सोमवारी रात्री 8 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जीणवले. जमिनीत 10 किलोमीटर खोल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. बिहारमध्ये पाटणा, कटिहार, भागलपूरसह अनेक जिल्ह्यात भूकंप जाणवला. तर भूकंपाचा दुसरा धक्का दार्जिलिंग, सिलीगुडी, दक्षिण दिनाजपूर, रायगंज, जलपाईगुडी, अलीपूरद्वारेमध्ये अनुभवायला मिळाला. इथं भूकंपाची तीव्रता 4.2 रिस्टर स्केल नोंदवली गेली आहे.

    नवी दिल्ली : देश भूकंपाने हादरला आहे. उत्तरेकडील अनेक राज्यात भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. आसाम, बिहार, सिक्किम आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने दिलेल्या माहितीमुसार भूकंपाची तीव्रता 5.4 रिस्टर स्केल इतकी होती. भूकंपाचं केंद्र सिक्किम – नेपाळ बॉर्डरवर असल्याचेे समजते.

    सोमवारी रात्री 8 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जीणवले. जमिनीत 10 किलोमीटर खोल भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. बिहारमध्ये पाटणा, कटिहार, भागलपूरसह अनेक जिल्ह्यात भूकंप जाणवला. तर भूकंपाचा दुसरा धक्का दार्जिलिंग, सिलीगुडी, दक्षिण दिनाजपूर, रायगंज, जलपाईगुडी, अलीपूरद्वारेमध्ये अनुभवायला मिळाला. इथं भूकंपाची तीव्रता 4.2 रिस्टर स्केल नोंदवली गेली आहे.

    दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम, बिहार, सिक्किम आणि पश्चिम बंगालमधील भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन भूकंपाबाबत सविस्तर माहिती घेतली आणि मदतीचं आश्वासनही दिलं आहे.