देशातील परकीय चलनाचा साठा विक्रमी पातळीवर, मोदी सरकारची सर्वोत्तम कामगिरी

मेड इन इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या योजना राबवल्या आहेत. या सगळ्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे देशातील परकीय गंगाजळी अर्थात परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserve) विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. चीन, जपान, स्वित्झर्लंड आणि रशियानंतर भारताकडे सर्वाधिक परकीय चलन साठा आहे.

    नवी दिल्ली: कोरोना  संकट काळातही देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian Economy) चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. देशात परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिल्यापासूनच प्राधान्य दिलं आहे.

    मेड इन इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या योजना राबवल्या आहेत. या सगळ्या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे देशातील परकीय गंगाजळी अर्थात परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserve) विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. चीन, जपान, स्वित्झर्लंड आणि रशियानंतर भारताकडे सर्वाधिक परकीय चलन साठा आहे.

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India-RBI) आकडेवारीनुसार, 2 जुलै 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात तब्बल 1.013 अब्ज डॉलर्सची भर पडून तो 610.012 अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे.