The danger increased even more; Corona becomes 'Delta Plus'

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सर्वांची झोप उडवली आहे. कोरोनाच्या विषाणूने आता रूप बदलले असून या नव्या व्हेरिएटचे नाव 'डेल्टा प्लस' आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्राध्यापक डॉ. अमरिंदर सिंग मल्ली यांनी एका मुलाखतीत कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट आता म्यूटेट होऊन डेल्टा प्लस विषाणू तयार झाला आहे.

    दिल्ली : देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सर्वांची झोप उडवली आहे. कोरोनाच्या विषाणूने आता रूप बदलले असून या नव्या व्हेरिएटचे नाव ‘डेल्टा प्लस’ आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्राध्यापक डॉ. अमरिंदर सिंग मल्ली यांनी एका मुलाखतीत कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट आता म्यूटेट होऊन डेल्टा प्लस विषाणू तयार झाला आहे.

    याआधी भारतात जेव्हा सिंगल व्हेरिअंट आढळून आला होता तेव्हा तो आधीच्या विषाणूपेक्षा दुप्पट वेगाने पसरत असल्याचे दिसून आले असल्याचे सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्डा व्हेरिएंटने सर्वांना बाधित केले.

    पण, आता डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या बाबतीत जीनोम सिक्वेसिंगकडून ज्यापद्धतीचा अहवाल आला आहे ते पाहता आता कोरोना संक्रमणाचा दर आता आणखी वेगाने वाढू शकतो, असे अमरिंदर सिंग मल्ली म्हणाले.

    हे सुद्धा वाचा