The government is not ready to discuss directly with the farmers

आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत, मात्र आधी चर्चा ही तीन कृषी कायद्यांविरोधात होईल, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी काल शनिवारी सांगितले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी नेते कंवलप्रीतसिंग पन्नू ( Kanwalpreet Singh Pannu ) यांनी आंदोलन तीव्र करण्याची घोषणा सिंघू सीमेवर(Singhu Border ) पत्रकार परिषदेत केली आहे.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात ( New Agricultural Laws ) दिल्लीच्या (Delhi) सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलन (Farmers Agitation) करत आहेत. आज आंदोलनाचा १८ दिवस आहे. परंतु या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी देशव्यापी आंदोलनाला हाक दिली आहे. आज सकाळी रविवारी चलो दिल्ली आंदोलनाला सुरूवात होणार आहे. तसेच या आंदोलनाला राजस्थानातील शहाजहाँपूर येथून जयपूर-दिल्ली महामार्गावरून सुरूवात होणार आहे. आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत, मात्र आधी चर्चा ही तीन कृषी कायद्यांविरोधात होईल, असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी काल शनिवारी सांगितले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी नेते कंवलप्रीतसिंग पन्नू ( Kanwalpreet Singh Pannu ) यांनी आंदोलन तीव्र करण्याची घोषणा सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केली आहे.

देशाच्या इतर भागांतील शेतकरीही आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारला चर्चा करायची असेल, तर आम्ही तयार आहोत. मात्र हे तिन्ही कायदे रद्द करण्याची आमची मुख्य मागणी कायम असेल. त्यानंतरच इतर मागण्यांबाबत विचार केला जाऊ शकतो,असेही पन्नू यांनी स्पष्ट केले. १४ डिसेंबरला सकाळी ८ ते ५ या वेळेत कायद्यांच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांचे नेते उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सरकारने आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांनी तसे होऊ दिले नाही. हे आंदोलन शांततेने सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अधिकपटीने भर होईल, यासाठी हे कायदे तयार करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळावी म्हणून पर्यायी बाजार उपलब्ध करण्याच्या उद्देशानेच नवे कृषी कायदे करण्यात आल्याचे आणि शेतकऱ्यांना आता शेतमाल मंडईत तसेच देशात कुठेही विकण्याची मुभा आहे, असे मोदींनी ‘फिक्की’च्या कार्यक्रमात सांगितले आहे.