दिल्लीत कोरोनाच्या विषाणूच्या संख्येत घट, लॉकडाऊनमध्ये सूट देण्याची घोषणा करू शकते दिल्ली सरकार

मुख्यमंत्री अरविंंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. दिल्लीत हळूहळू कोरोनाची स्थिती आता चांगली होत आहे. या स्थितीला बघून मागील आठवड्यापासून आपण अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. कोरोनाची स्थिती जर सुधारत असेल तर अर्थव्यवस्थेला गती देणं खूप महत्त्वाचं आहे. गेल्या आठवड्यात आपण कन्स्ट्रक्शन वर्कर आणि फॅक्टरी वर्कर हे दोन सेक्टर खुले करण्यात आल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

    नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोविड-१९ च्या मुद्यावर बोलत असताना, दिल्लीत कोरोना विषाणूची संख्या कमी होत असल्यामुळे पुढच्या आठवड्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळणार असल्याची घोषणा दिल्ली सरकारकडून केली जाऊ शकते. अधिकाऱ्यांनी याबाबत शनिवारी माहिती दिली आहे.

    मुख्यमंत्री अरविंंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. दिल्लीत हळूहळू कोरोनाची स्थिती आता चांगली होत आहे. या स्थितीला बघून मागील आठवड्यापासून आपण अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. कोरोनाची स्थिती जर सुधारत असेल तर अर्थव्यवस्थेला गती देणं खूप महत्त्वाचं आहे. गेल्या आठवड्यात आपण कन्स्ट्रक्शन वर्कर आणि फॅक्टरी वर्कर हे दोन सेक्टर खुले करण्यात आल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

    मागील २४ तासांत दिल्लीत ४०० इतक्या नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. परंतु ५०० पेक्षाही केसेस कमी झाले आहेत. तसेच पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा कमी झाली आहे. मागील आठवड्यातील लॉकडाऊन सोमवारपर्यंत आहे. मात्र, पुढच्या काही दिवसांसाठी लॉकडाऊन अशाच प्रमाणात सुरू राहणार असून काही निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

    दिल्लीत मॉल्स आणि दुकाने सोमवारी सुरू करण्यात येणार असून आळीपाळीने उघडण्यात येणार आहेत. तसेच ही दुकाने सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहतील. सरकारी कार्यालयांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनांच १०० टक्क्यांपर्यंत मंजूरी देण्यात येणार आहे. तर खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील दुकाने २४ तास सुरू राहणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.