tea for mp

राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना या खासदारांनी मोठा गोंधळ घातला होता. उपसभापतींच्या समोरील माईकही तोडून टाकण्याचा प्रयत्न झाला. यामुळे दुसऱ्या दिवशी सभापती व्यंकया नायडू यांनी ८ही खासदारांना ७ दिवसांसाठी निलंबित केले आहे.

दिल्ली : राज्यसभेत कृषी विधेयक (Fatmers Bill) सादर करताना गोंधळ घातल्यामुळे ८ खासदारांना (MP) निलंबित (suspended ) करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ८ खासदरांनी गांधीगिरी करत रात्रभर संसद भवनात ठिय्या आंदोलन केले होते. त्यांच्या या गांधीगिरीला खुद्द उपसभापती (Deputy Speaker)  हरिवंश नारायण सिंह यांनी सकाळी चहा (Tea) आणला होता.

राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना या खासदारांनी मोठा गोंधळ घातला होता. उपसभापतींच्या समोरील माईकही तोडून टाकण्याचा प्रयत्न झाला. यामुळे दुसऱ्या दिवशी सभापती व्यंकया नायडू यांनी ८ही खासदारांना ७ दिवसांसाठी निलंबित केले आहे.


त्यामुळे सर्व खासदारांनी सभागृहाबाहेर गांधी पुतळ्याजवळ रात्रभर ठिय्या मांडला होता. त्यांनी रात्रभर ठिय्या सोडला नाही. अखेर सकाळी खुद्द उपसभापतीच या आठही खासदारांसाठी चहा घेऊन आले होते. हरिवंश सिंह यांनी चहा आणल्यामुळे काँग्रेस खासदार निपूर बोरा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, हरिवंश यांनी आमच्यासाठी चहा आणून ते आमच्यासोबत एक सहकाऱ्याप्रमाणेच वागले आहेत. त्यामुळे आता संसदेत यावर चर्चा करुन आमचे निलंबन मागे घ्यावे. असे ते म्हाणाले.

हे आहेत ठिय्या आंदोलन करणारे आठ खासदार

संसदेच्या परिसरात राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्यासह काँग्रेसचे तीन, डाव्या पक्षाचे दोन, तृणमूल काँग्रेसचे दोन आणि आम आदमी पक्षाचे एक खासदार अशा आठ खासदारांनी ठिय्या मांडला होता. डेरेक ओब्रायन, दोला सेन (तृणमूल), राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन (काँग्रेस), संजय सिंह (आप), के.के. रागेश, इल्लामारम करीम (CPI-M) यांचा समावेश आहे.

विरोधकांची मुस्कटदाबी होत आहे

खासदारांवर केलेली कारवाई म्हणजे, मुस्कटदाबी असल्याची टीका या खासदारांनी केली आहे. सरकार आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही खासदारांनी केला आहे.