देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरतोय; गेल्या २४ तासात १.६५ नव्याने बाधित रुग्णांची नोंद

महाराष्ट्र , केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांतील कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन किंवा इतर निर्बंध पुढील पंधरादिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्ली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

    दिल्ली: देशातील कोरोनाच्या संसर्गाची दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत चालला आहे. बाधितांची आकडे घटत असले तरी मृत्यूची संख्या फारशी घटना दिसत नाही. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात १ लाख ६५ हजार ५५३ नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ३४६० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तसेच २ लाख ७६ हजार ३०९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

    देशात सलग तिसऱ्या आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या दैनंदिन रुग्णांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या ४६ दिवसांमधील सर्वात कमी कोरोनाबाधितांची आज नोंद करण्यात आली आहे. ता२९ मी या दिवशी देशात २१ कोटी २० लाख ६६ हजार ६१४ लोकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच तापर्यंत ३४ कोटी ३१ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात २० लाख कोरोना चाचण्यांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८ टक्क्यांहून अधिक आहे.

    राज्यात रोज कमी होणाऱ्या रुग्णसंख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज २०, २९५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३१ हजार ९६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता रिकव्हरी रेट ९३. ८४ टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज ४४३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहेत. राज्यात सध्या सहा जिल्ह्यांमध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्या हजारच्या पुढे नोंद होत आहे. यात मुंबई १०३८, अहमदनगर १२४६, पुणे १२५९ सातारा २१७७, कोल्हापूर १६११ आणि सांगली १०६३ असा समावेश आहे.

    महाराष्ट्र , केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांतील कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन किंवा इतर निर्बंध पुढील पंधरादिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्ली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पुन्हा सुरु झाल्याने कोरोना लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. अमेरिकेनंतर भारत हा दुसरा देश आहे ज्याने लसीकरणाचा २१ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. परंतु जर आपण लोकसंख्येच्या आधारे विचार केला तर आपण बर्‍याच देशांच्या मागे असल्याचं आकडेवारी सांगते. टक्केवारीनुसार पाहिलं तर भारतात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. तथापि, आपल्या देशात लसीकरणाचा वेग जूनपासून वाढण्याची अपेक्षा आहे. भारताने लसीकरणाचा २१ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ तीन टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. तर १२ टक्के लोकांनी पहिला डोस दिला आहे.