The farmer celebrated the girl's first birthday by cutting a cake on the Tikri border

दिल्ली : कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप शेतकऱ्यांनी माघार घेतलेली नाही. शेतकऱ्यांनी आपली सुख दुख आता इथेच साजरी करण्यास सुरुवात केली आहे. एका शेतकऱ्याने आंदोलनस्थळी केक कापून मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे.

आंदोलनामुळे शेकडो शेतकरी आपल्या घरापासून कुंटुंबियांपासून दूर आहेत. आपले सुख दुख:चे क्षण हे शेतकरी एकमेकांसह शेअर करत आहेत. रविवारी अशाच प्रकारे टिकरी सीमेवर एका शेतकऱ्याच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला.

आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणीच शेतकऱ्यांनी केक कापला. कुटुंबासमवेत घरी वाढदिवस साजरा होत असताना  वडिलांनी इथे शेतकऱ्यांच्या समवेत आपला आनंद साजरा केला.