दिल्लीत सुरु झाली देशातील पहिली ‘ड्रायव्हरलेस’ मेट्रो ; पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

नवी दिल्ली : देशातील पहिल्या चालकरहित अर्थात ड्रायव्हरलेस मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी हिरवा झेंडा दाखवला. ही मेट्रो मजेंटा लाईनवर धावणार आहे. देशातल्या पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रो सेवेचं व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे उद्धघाटन करण्यात आलं

नवी दिल्ली : देशातील पहिल्या चालकरहित अर्थात ड्रायव्हरलेस मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी हिरवा झेंडा दाखवला. ही मेट्रो मजेंटा लाईनवर धावणार आहे. देशातल्या पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रो सेवेचं व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे उद्धघाटन करण्यात आलं. त्याशिवाय पंतप्रधानांनी ‘एयरपोर्ट एक्सप्रेस लाइन’वर ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) सेवेचीही सुरुवात केली आहे.या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही सामिल झाले होते.

 

दिल्लीमध्ये मॅजेंटा लाईनसोबतच पिंक लाईनवरही २०२१ च्या मध्यापर्यंत ड्रायव्हरलेस ट्रेन सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.’नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ अर्थात एनसीएमसी, एयरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर पूर्णपणे संचालित केलं जाईल. त्याशिवाय देशातील कोणत्याही भागातून जारी रूपे-डेबिट कार्ड असणारा व्यक्ती याचा उपयोग करून या मार्गावर प्रवास करू शकतो. ही सुविधा २०२२ पर्यंत दिल्ली मेट्रोच्या संपूर्ण नेटवर्कवर उपलब्ध होईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.