
जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिली. दरम्यान भारतात कोणत्याही लस निर्मिती कंपनीला कोरोना लशीच्या आपतकालीन वापरास मंजुरी देण्यात आलेली नाही. २८ डिसेंबरला कोरोना लशीची पहिली खेप येईल. या दिवशी कोरोना लशीचे ८० लाख डोस आपल्याला मिळतील असे दिल्ली एअरपोर्टचे सीईओ विदेह कुमार जयपुरिया (Videh Kumar Jaipuria) यांनी सांगितले.
दिल्ली : कोरोना लशीची पहिली लॉट २८ डिसेंबरला भारता दाखल होणार आहे. यानंतर देशात प्रत्यक्षात कोरोना लसीकरण सुरु होणार आहे. राजधानी दिल्लीत याची जोरदार तयारी सुरु असून प्रशासन सज्ज आहे.
भारतात दाखल होणारी ही कोरोना लस साठवण्यासाठी राजीव गांधी रुग्णालयात डीप फ्रीजरची सोय करण्यात आली असल्याची माहिती रुग्णालयाच्या नोडल अधिकाऱ्यांनी दिली.
जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिली. दरम्यान भारतात कोणत्याही लस निर्मिती कंपनीला कोरोना लशीच्या आपतकालीन वापरास मंजुरी देण्यात आलेली नाही.
२८ डिसेंबरला कोरोना लशीची पहिली खेप येईल. या दिवशी कोरोना लशीचे ८० लाख डोस आपल्याला मिळतील असे दिल्ली एअरपोर्टचे सीईओ विदेह कुमार जयपुरिया (Videh Kumar Jaipuria) यांनी सांगितले. मात्र, ही लस कोणत्या कंपनीची असेल हे अद्याप जाहीर झालेले नाही.
No specific date has been given for vaccine re-distribution. If you look at whatever is the govt line, sometimes in January 2021, #COVID19 vaccine should be available for redistribution: Delhi International Airport (DIAL) CEO Videh Jaipuriar on redistribution of #COVID19 vaccines https://t.co/hlXL0idrmW pic.twitter.com/ggGKaRjSlM
— ANI (@ANI) December 22, 2020
केंद्राने राज्य सरकारांना सोबत घेऊन गेल्या काही महिन्यांपासूनच लशीकरणाची तयारी सुरु केली आहे. राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात आले असून मास्टर ट्रेनर्संना ट्रेनिंग देण्यात आली आहे. हे ट्रेनर्स देशातील हजारो स्वयंसेवकांना ट्रेनिंग देणार आहेत. २६० जिल्ह्यातील २० हजारांपेक्षा अधिक लोकांना आतापर्यंत ट्रेनिंग दिल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचे म्हणणे आहे.
Co-WIN नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला असून, याद्वाके लशीच्या डिलिव्हरीचे रियल-टाईम मॉनिटरिंग केले जाणार आहे. तसेच याद्वारे लशीच्या तापमानाचीही नोंद घेतली जाणार आहे.
देशभरात २८ ते २९ हजार कोल्ड चेन पॉइंट्स असून त्यांना यासाठी स्ट्रीमलाईन केलं जात आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनुसार, जानेवारी महिन्यापासून लशीकरण सुरु होईल. सुरुवातीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.