संस्थापकांनी त्यांचा आत्मा गमावला; मेहता, सुब्रह्मण्यम यांच्या राजीनाम्यावर RBI चे माजी गव्हर्नर राजन यांचे भाष्य

राजन यांनी मोदी सरकारमधील माजी मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) अरविंद सुब्रह्मण्यम यांच्या राजीनाम्याचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, सुब्रह्मण्यम आणि मेहता यांची राजीनामापत्रे म्हणजे विद्यापीठाचे संस्थापक त्रासदायक टीकांपासून मुक्त होण्यासाठी बाहेरील दबावाला बळी पडले आहे असे दिसून येते. अशोका विद्यापीठ हे या आठवड्यापर्यंत केंब्रिज, हार्वर्ड आणि ऑक्सफोर्ड सारख्या विद्यापीठांना येत्या दशकात भारताकडून संभाव्य प्रतिस्पर्धी मानला जाईल असे काम करत होते.

    दिल्ली : अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एका महान विद्यापीठाचा आत्मा आहे आणि त्याच्याशी तडजोड करून अशोक विद्यापीठाच्या संस्थापकांनी आपला आत्मा गमावला आहे, अशा शब्दात अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपले मत व्यक्त केले. उल्लेखनीय असे की याच आठवड्याच्या प्रारंभी प्रताप भानू मेहता यांनी अशोका विद्यापीठातून राजीनामा दिला होता. त्यावर राजन यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये भाष्य केले आहे. भारतासाठी ही एक दु:खद घटना आहे, असे ते म्हणाले.

    अशोकाच्या संस्थापकांना हे समजले पाहिजे होते की त्यांचे ध्येय खरंतर राजकीय बाजू घेण्याचे नाही तर मेहतांसारख्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांचे संरक्षण करणे आहे. कारण असे केल्याने ते अशोकाला भारताच्या कल्याणासाठी सर्वात मोठे योगदान देण्यास सक्षम करत होते,काय चूक आहे हे ओळखण्यासाठी आणि त्या चूकांवर उपाय शोधाण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करत होते असे राजन म्हणाले.

    राजन यांनी मोदी सरकारमधील माजी मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) अरविंद सुब्रह्मण्यम यांच्या राजीनाम्याचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, सुब्रह्मण्यम आणि मेहता यांची राजीनामापत्रे म्हणजे विद्यापीठाचे संस्थापक त्रासदायक टीकांपासून मुक्त होण्यासाठी बाहेरील दबावाला बळी पडले आहे असे दिसून येते. अशोका विद्यापीठ हे या आठवड्यापर्यंत केंब्रिज, हार्वर्ड आणि ऑक्सफोर्ड सारख्या विद्यापीठांना येत्या दशकात भारताकडून संभाव्य प्रतिस्पर्धी मानला जाईल असे काम करत होते. वास्तविकता अशी आहे की प्राध्यापक मेहता हे आस्थापनेच्या बाजूने एक काटा आहेत. ते कोणताही सामान्य काटा नाही. विरोधी पक्षांबद्दलही त्यांना सहानुभूती आहे असेही नाही, असेही राजन म्हणाले.