देशात तयार होणाऱ्या वनस्पती लोणी विक्रीवर सरकारची पाळत

  • नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वनस्पती तेलापासून बनविण्यात येणारे कृत्रिम लोणी मानवी आरोग्यास धोकादायक आहे. याचे अपायकारक निदर्शने समोर आल्याच्या घटना घडल्या आहेत. या कृत्रिम लोण्यामुळे जे शेतकरी गायीच्या दुधापासून लोणी तयार करतात त्यांच्या व्यवसायावर मोठा फटका बसला आहे. याशिवाय कृत्रिम लोण्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त आहे.

दिल्ली – देशात कृत्रिम लोण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. कृत्रिम लोण्यामुळे देशातील जनतेच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होता आहे. यामुळे वनस्पती तेलापासून काढण्यात येणाऱ्या कृत्रिम लोण्याविषयी लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयास पत्र लिहिले आहे. पत्राद्वारे त्यांनी कृत्रिम लोण्यावर बंदी घालण्याची विनंती केली आहे. या पत्राची पीएमओने दखल घेतली आहे. आणि आरोग्य मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय सुरक्षा खाद्य आणि मानक प्राधिकरणास सूचना देण्यात आली आहे. तसेच यावर नियमावली तयार करण्यास सांगितले आहे. 

नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वनस्पती तेलापासून बनविण्यात येणारे कृत्रिम लोणी मानवी आरोग्यास धोकादायक आहे. याचे अपायकारक निदर्शने समोर आल्याच्या घटना घडल्या आहेत. या कृत्रिम लोण्यामुळे जे शेतकरी गायीच्या दुधापासून लोणी तयार करतात त्यांच्या व्यवसायावर मोठा फटका बसला आहे. याशिवाय कृत्रिम लोण्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त आहे. वनस्पती लोणी आणि गायीच्या दुधाचे लोणीचा रंग सारखाच असल्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत आहे. ग्राहकांना आपण काय खातोय, हेही कळायला मार्ग नाही आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार भारतीय सुरक्षा खाद्य आणि मानक प्राधिकरण नवीन नियमावली तयार करीत आहे. या नियमावलीमध्ये श्रेणीतील खाद्यपदार्थांमध्ये फॅटचे प्रमाण कमी केले जाणार आहे. आता ५ टक्के आहे त्यात सुधारणा करुन ३ टक्के केले जाणार आहे. यामध्ये ओळख पटण्यासाठी विशेष चिन्हाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कृत्रिम लोण्याचा किती उपयोग करण्यात आला आहे. हे स्पष्ट होईल.