प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कृषी कायद्यांवरून शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये तिढा कायम आहे. गुरुवारी दिवसभर झालेल्या बैठकीत शेतकरी नेत्यांनी तीन कायद्यांतील विविध कलमांवर आक्षेप नोंदविला. यावर केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि डझनभर अधिकाऱ्यानी प्रेझेंटेशनसह स्पष्टीकरण दिले; परंतु शेतकरी नेत्यांचे समाधान झाले नाही. उशिरा रात्रीपर्यंत झालेल्या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी सरकारी चहाच काय जेवणही नाकारले. त्यांच्यासाठी गुरुद्वारातील लंगरमधूनच जेवण व चहा आला.

दिल्ली (Delhi).  कृषी कायद्यांवरून शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये तिढा कायम आहे. गुरुवारी दिवसभर झालेल्या बैठकीत शेतकरी नेत्यांनी तीन कायद्यांतील विविध कलमांवर आक्षेप नोंदविला. यावर केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि डझनभर अधिकाऱ्यानी प्रेझेंटेशनसह स्पष्टीकरण दिले; परंतु शेतकरी नेत्यांचे समाधान झाले नाही. उशिरा रात्रीपर्यंत झालेल्या चर्चेदरम्यान शेतकऱ्यांनी सरकारी चहाच काय जेवणही नाकारले. त्यांच्यासाठी गुरुद्वारातील लंगरमधूनच जेवण व चहा आला.

आंदोलनाच्या आठव्या दिवशी कडाक्याची थंडी आणि हृदयाघातामुळे ४ शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला आहे तरीही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. दिल्लीच्या सीमाही जवळपास सील झाल्या आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश व तामिळनाडूतील शेतकऱ्यांनीही आंदोलनास सुरुवात केली आहे.

आजपासून देशव्यापी आंदोलन
सरकारसोबतची चर्चा निष्फळ झाल्याचे स्पष्ट होताच शेतकरी संघर्ष समन्वय समितीने आज शुक्रवारपासूनच देशव्यापी आंदोलनाची रूपरेषा तयार केली. आज दिल्लीतील जंतर मंतर येथे शेतकरी मोर्चा काढणार आहेत शिवाय मोदी सरकार, अंबानी, अदानी व अन्य कॉर्पोरेट हाऊसचे पुतळादहनही करणार आहे.