The ‘Green Expressway’ will pass through six states; Travel from Delhi to Mumbai in just 12 hours

दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा ग्रीन एक्स्प्रेस वे महामार्ग 1 लाख कोटी रुपये खर्च करुन पूर्ण केला जात आहे. या महामार्गाचे काम 2023 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. या महामार्गाचे काम तीन राज्यात प्रत्यक्ष सुरु झाले आहे. 1380 कि.मीचा हा महामार्ग देशातील सर्वात लांबीचा महामार्ग असेल. प्रकल्पामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर 12 तासात पूर्ण करता येणार आहे.

    दिल्ली : दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा ग्रीन एक्स्प्रेस वे महामार्ग 1 लाख कोटी रुपये खर्च करुन पूर्ण केला जात आहे. या महामार्गाचे काम 2023 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. या महामार्गाचे काम तीन राज्यात प्रत्यक्ष सुरु झाले आहे. 1380 कि.मीचा हा महामार्ग देशातील सर्वात लांबीचा महामार्ग असेल. प्रकल्पामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर 12 तासात पूर्ण करता येणार आहे.

    हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रासह सहा राज्यांतून हा महामार्ग जाईल. महामार्गामुळे दिल्ली ते मुंबई अंतर 130 किलोमीटरने कमी होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच दिल्ली, फरिदाबाद, सोहना, जयपूर या शहरांना महामार्गामुळे जोडले जाईल.
    दिल्ली-मुंबई आठ पदरी एक्स्प्रेस-वे जगातील सर्वात मोठा महामार्ग असून यामुळे दिल्लीहून अवघ्या 12 तासांमध्ये मुंबईला पोहचणे शक्य होणार आहे. हा मार्ग सहा राज्यांमधून जाणार असून एअर अॅम्ब्युलन्स म्हणजेच हवाई मार्गाने रुग्णांची ने आण करण्यासाठी वापर करता येणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत जाऊन महामार्गाची पाहणीसुद्धा केली.

    मी प्रत्येक कामाचे निरीक्षण करतो, रस्त्याची पाहणी करताना काम चांगल्या पद्धतीने झाल्याचे आपण येथील अधिकाऱ्यांना सांगितले. रस्त्याची गुणवत्ता चांगली असावी यासाठी आमचा नेहमीच आग्रह आहे. कारण आम्ही कंत्राटदाराकडून पैसे घेत नाही, आणि गुणवत्ता चांगली नसेल तर कंत्राटदाराला ठोकण्यासही मागे पुढे पाहत नाही. रस्त्याच्या गुणवत्तेशी तडजोड करण्याचे दिवस इतिहासात जमा झाले आहे. त्यामुळे असे करणे कंत्राटदारांना महागात पडेल.

    - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री