The helmet you are wearing is fake, isn't it? He will have to pay a fine of Rs 5 lakh and go to jail for a year

देशभरात हेल्मेट सक्तीचा कायदा लागू करण्यात आला आहे. यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. त्यातच आता केंद्राकडून हेल्मेटबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत. बनावट हेल्मेटबाबत हा नियम आहे.

  दिल्ली : देशभरात हेल्मेट सक्तीचा कायदा लागू करण्यात आला आहे. यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. त्यातच आता केंद्राकडून हेल्मेटबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत. बनावट हेल्मेटबाबत हा नियम आहे.

  यामुळे बनावट हेल्मेट विकणाऱ्यांना पाच लाखांचा दंड आणि वर्षभरासाठी जेलमध्येही जावे लागू शकते.
  देशभरात मोठ्या प्रमाणात दुय्यम दर्जाच्या आणि बनावट हेल्मेटची विक्री केली जात आहे. बनावट हेल्मेटच्या वापरावर 1 जून 2021 पासून बंदी घालण्यात आली आहे. ISI (आयएसआय) मार्क असलेले हेम्लेट विकणाऱ्यांना तसेच ते विकत घेणाऱ्या दोघांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

  यामुळे हेल्मेट खरेदी करतानाच नीट तपासणी करुन हेल्मेट खरेदी करावे. यामुळे हेल्मेट खरेदी करताना त्याच्यासोबत ISIसर्टिफिकेट आहे का हे तपासावे. आयएसआय मार्कसह या हेल्मेटला BIS (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) सर्टिफाइड असणे गरजेचे आहे. हेल्मेटवर आयएसआयचे चिन्ह असायला हवे.

  रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम न पाळणाऱ्यांना पाच लाखांचा दंड आणि १ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. असे हेल्मेट वापरणाऱ्यांवरदेखील वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात.

  हे सुद्धा वाचा