The historic achievements of women pilots in India; Non-stop flight for 16 consecutive hours on difficult air routes

भारताच्या महिला वैमानिकांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सलग १६ तास Non Stop उड्डाण करत या महिला वैमानिकांनी नवा इतिहास रचला आहे. या कामगिरीमुळे भारतीय महिलांनी यशाच्या पेचात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे.

नवी दिल्ली : भारताच्या महिला वैमानिकांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सलग १६ तास Non Stop उड्डाण करत या महिला वैमानिकांनी नवा इतिहास रचला आहे. या कामगिरीमुळे भारतीय महिलांनी यशाच्या पेचात आणखी एक मानाचा तुरा गोवला गेला आहे.

एअर इंडियांच्या महिला वैमानिकांनी जगातील सर्वात लांब हवाई मार्ग असलेल्या उत्तर ध्रुवावरून उड्डाण घेऊन इतिहास रचला. या विमानाने अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथून उड्डाण घेतले. त्यानंतर ही टीम उत्तर ध्रुवावरून बंगळुरूला पोहोचली. या दरम्यान, महिला वैमानिकांच्या टीमने १६,००० किलोमीटरचा पल्ला पार पाडला.

या ऐतिहासिक उड्डाणाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. एअर इंडियाने स्वत: ट्विटरवरून या ऐतिहासिक उड्डाणाची माहिती दिली आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनीही याबाबत ट्विट करून महिला वैमानिकांचे अभिनंदन केले आहे.

ही टीम सध्या उत्तर ध्रुवाववरून गुजरातला पोहोचली आहे. हे विमान उत्तर ध्रुवावरून अटलांटिक मार्गे बंगळुरू एअर पोर्टला दाखल झालं. कॅप्टन जोया अग्रवाल यांच्या नेतृत्वात ही ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली. को-पायलट म्हणून जोया यांच्यासोबत कॅप्टन पापागरी तनमई, कॅप्टन शिवानी आणि कॅप्टन आकांक्षा सोनवरे होत्या.