‘तौक्ते’ नंतर देशाला ‘यास’ चक्रीवादळाचा धोका; पंतप्रधान मोदींनी बोलावली एनडीएमएच्या अधिकाऱ्यांची बैठक

'यास' नावाच्या नव्या चक्रीवादळ येण्याची शक्यता भारलेला हवामान खात्याने वर्तवली आहे. ओडिसा व पश्चिम बंगालमच्या किनारापट्टीला याचा तडाखा बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकऱ्यांशी बैठक घेत आहेत.

    नवी दिल्ली: देशात तौक्ते चक्रीवादळाचा धोका कमी होतोय न होतोय तोच ‘यास’ नावाच्या नव्या चक्रीवादळ येण्याची शक्यता भारलेला हवामान खात्याने वर्तवली आहे. ओडिसा व पश्चिम बंगालमच्या किनारापट्टीला याचा तडाखा बसण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकऱ्यांशी बैठक घेत आहेत. या बैठकीत वादळापासून बचाव कसा करता येईल याविषयी चर्चा केली जात आहे.


    बंगालच्या खोऱ्यात बंगालच्या उपसागराच्या मध्य पूर्वी भागत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ही स्थिती उद्या म्हणजे २४ मे पर्यंत चक्रीवादळाचे रुप घेणार आहे. हवामान विभागानुसार, चक्रीवादळ उत्तर,उत्तर – पश्चिमच्या दिशेने प्रवास करणार असल्याची शक्यता आहे. जे २४ मेला एका चक्रीवादळाचे रुप घेणार आहे. पुढील २४ तासात चक्रीवादळाचे रुप घेणार असून २६ मेला प. बंगाल आणि ओडिसाच्या किनाऱ्याला धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यात २२ ते २६ मे पर्यंत जोरदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तण्यात आली आहे.

    या वादळाची शक्यता लक्षात घेत भारतीय नौदलाने ‘यास’ चा इशारा देत बचाव कार्यासाठी कंबर कसली आहे. पूर्वी किनारपट्टीवर चार जहाजे आणि विमानांना तयार ठेवले आहे. यासह गोताखोर आणि मेडिकल टीमलाही तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.