सासरमध्ये पत्नीला होणाऱ्या मारहाणीसाठी पतीच जबाबदार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

सासरमध्ये पत्नीला होणाऱ्या मारहाणीसाठी पतीच जबाबदार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. पत्नीला कुटुंबातील इतर सदस्यांकडून दुखापत झाली असली तरी त्यासाठी पतीला जबाबदार धरलं जावं. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे हे तिसरे लग्न आहे, तर महिलेचे दुसरे लग्न आहे. असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

    नवी दिल्ली : पती-पत्नी किंवा सासरच्या माणसांकडून पत्नीची मारहाण झाली. तर पत्नी या माराहाणीला आणि जाचाला कंटाळून आपलं घर सोडून माहेरी निघून जाते. तसेच तिला वेगळं रहायचं असल्यास याबाबत ती मोठा निर्णय घेते. दरम्यान सुप्रीम कोर्टाने आपल्या पत्नीला मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीची जामीन देण्याच्या विनंतीची याचिका फेटाळून लावली आहे.

    सासरमध्ये पत्नीला होणाऱ्या मारहाणीसाठी पतीच जबाबदार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. पत्नीला कुटुंबातील इतर सदस्यांकडून दुखापत झाली असली तरी त्यासाठी पतीला जबाबदार धरलं जावं. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे हे तिसरे लग्न आहे, तर महिलेचे दुसरे लग्न आहे. असं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर २०१८ मध्ये दोघांनीही एका बाळाला जन्म दिला. मागील वर्षी जून महिन्यात महिलेने लुधियाना पोलीस स्टेशनमध्ये पती आणि आपल्या सासरच्या विरोधात तक्रार दाखल केली. हुंड्याची मागणी पूर्ण करु न शकल्याने पती, सासु आणि सासरे मारहाण करत आहेत. छळ करत आहेत. असा आरोप महिलेने केला होता. त्यानंतर पतीची बाजू मांडणारे वकील कुशाग्र महाजन यांनी आरोपीला अंतरिम जामीन देण्याची मागणी केली होती. यावर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील बँचने म्हटलं की, तुम्ही कशा पद्धतीचे व्यक्ती आहात? महिलेने आरोप केलाय की पती तिला गळा दाबून मारणार होता. तिचा आरोप आहे की तिचा गर्भपात झाला आहे.

    वकीलाने जेव्हा म्हटलं की महिलेने स्वत: आरोप केलाय की, तिचे सासरे तिला मुलाच्या हातून मारहाण करतात. यावर सीजेआय यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटलं की, यामुळे काहीही फरक पडत नाही की त्याचे वडील मुलाच्या हातून मारहाण करतात. सासरमध्ये जेव्हा एका महिलेला दुखापत किंवा इजा होते, तेव्हा त्याची प्राथमिक जबाबदारी पतीची असते. असं म्हणत कोर्टाने व्यक्तीची जामीनाची याचिका फेटाळून लावली आहे.