नवऱ्याने सोडले, माहेरच्यांनीही टाकले; पण ६ महिन्याच्या बाळाला सांभाळत ती बनली पोलीस उपनिरीक्षक

स्वतःचा आणि आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी अनेक लहान मोठी कामे केली. यादरम्यान तिने आईस्क्रीम आणि लिंबू पाणीही विकले. डोर-टू-डोर डिलिव्हरी देण्याची कामेही केली आणि हँडीक्राफ्टची विक्रीही केली. अॅनी यांच्या एका नातेवाईकाने त्यांना पोलीस अधिकाऱ्याची सेवा बाजवण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच सोबत सब इन्स्पेक्टरची परीक्षा देण्यासही सांगितले.

    दिल्ली: समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे. अत्याचार झाल्यानंतर महिला नैराश्यात जातात किंवा आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. पण सगळ्यातून बाहेर पडून जिद्दीने उभ्या राहणाऱ्या महिलाच पुढे जातात. अशीच एक घटना समोर आली आहे. या महिलेच्या पतीने तिला सोडून दिल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी देखील तिची साथ सोडली. यामुळे आपल्या सहा महिन्यांच्या बाळासोबत ही महिला एकटीच राहू लागली आणि आता ती एसआय बनली आहे. या महिलेचे नाव अॅनी शिवा असे आहे.

    पल्या परिवारच्या विरोधात जाऊन अॅनी यांना लग्न केले होते. एका मुलाला जन्म दिल्यानंतर पतीने त्यांना सोडले. पतीने सोडल्यामुळे त्या अवघ्या ६ महिन्यांच्या मुलाला घेवून माहेरी आल्या. तेव्हा त्यांच्या घरच्यांनीही त्यांना झिडकारले. एवढेच नाही तर तिच्या रक्ताच्या नात्याच्या माणसांनी अॅनी शिवा आणि त्यांच्या ६ महिन्यांच्या मुलाला घराबाहेर काढले. घरा बाहेर काढल्यानंतर एनी शिवा त्यांच्या मुलासोबत आजीच्या घरामागे असलेल्या एक झोपडीत राहू लागल्या.

    स्वतःचा आणि आपल्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी अनेक लहान मोठी कामे केली. यादरम्यान तिने आईस्क्रीम आणि लिंबू पाणीही विकले. डोर-टू-डोर डिलिव्हरी देण्याची कामेही केली आणि हँडीक्राफ्टची विक्रीही केली. अॅनी यांच्या एका नातेवाईकाने त्यांना पोलीस अधिकाऱ्याची सेवा बाजवण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच सोबत सब इन्स्पेक्टरची परीक्षा देण्यासही सांगितले. त्यांनी परीक्षेची तयारी करण्यासाठी काही पैसेही दिले. २०१६ मध्ये त्यांना यश मिळाले आणि त्या पोलीस अधिकारी झाल्या.

    दरम्यान, तीन वर्षांनंतर त्यांनी सब इन्स्पॅक्टरची परीक्षाही उत्तीर्ण केले आणि दीड वर्षांच्या ट्रेनिंगनंतर त्या शनिवारी वरकला पोलीस स्थानकात प्रोबेशनरी सब-इन्स्पॅक्टर म्हणून रुजू झाल्या. आपल्या यशाबाबत बोलताना अॅनी म्हणाल्या की ‘माझं पोस्टिंग काही दिवसांपूर्वी वरकला पोलीस स्टेशनमध्ये झाल्याचे मला कळले. ही अशी जागा आहे, जिथे मी माझ्या लहान मुलासह कित्येकदा अश्रू ढाळले आणि मला पाठिंबा देणारं कोणीही नव्हतं.’