In Kerala, leopard meat is cooked and eaten; Five arrested

बिबट्या अतिशय सावधगिरीनं घरात प्रवेश(leopard entered the house) करतो. मात्र, घरात शिरल्यानंतर त्याला धोका जाणवताच तो तितक्याच चपळाईने माघारी पळतो.

    नवी दिल्ली: जंगली प्राण्यांमध्ये आपली चपळता आणि आक्रमकतेसाठी बिबट्या(Leopard) ओळखला जातो. मात्र अलीकडच्या काळात लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर अधिक वाढायला लागला आहे. यातूनच अनेकदा बिबट्याने माणसांवर हल्लेही केले आहेत. अशातच सोशल मीडियावर बिबट्याचा एका व्हिडीओ व्हायरल (video viral)झाला आहे. मात्र हा व्हिडीओ बघितल्यानंतर भीतीने गाळण उडाल्याशिवाय राहत नाही अन नंतर मात्र पुढे जे होते ते बघून सर्वजण थक्क होतात.

    सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये एका घराचा दरवाजा उघडा असल्याचं पाहून बिबट्या अतिशय सावधगिरीनं घरात प्रवेश(leopard entered the house) करतो. मात्र, घरात शिरल्यानंतर त्याला धोका जाणवताच तो तितक्याच चपळाईने माघारी पळतो. ही घटना कर्नाटकच्या बांदीपूर येथील असल्याचे म्हटले जात आहे.

    या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अनेकांनी बिबट्याच्या मानवी वस्तीतील वाढत्या वावरा बदल भीतीही व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @WildLense_India या ट्विटर अकाऊंटवरून मंगळवारी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले , की दावा केला जात आहे, की ही क्लिप बांदीपूर विंडफ्लावर येथील आहे. यात स्क्रीनवर ३१ ऑगस्ट तारीख आणि ४ वाजल्याचे दिसत आहे.