deputy chairperson

राज्यसभेत घडलेल्या घडामोडींमुळे उपसाभपती हरिवंश यांनी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना माहिती दिली आहे.

दिल्ली : कृषी विधेयकाबाबत रविवारी राज्यसभेत (Rajya Sabha) गोंधळ घालणाऱ्या ८ खासदारांना (MP) काल निलंबित करण्यात आले होते. यामध्ये डेरेक ओ’ब्रायन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन यांचा समावेश आहे. निलंबनाच्या कारवाई विरोधात या खासदारांनी काल रात्रभर संसद परिसरात गांधीजींच्या प्रतिमेजवळ प्रदर्शन केले.

दुसरीकडे, राज्यसभेत घडलेल्या घडामोडींमुळे उपसाभपती हरिवंश  (deputy speaker) यांनी एकदिवसीय उपोषण ( one-day fast)  करण्याचा निर्णय (decision) घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी माहिती दिली आहे.


राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू म्हणाले की, राज्यसभेच्या उपसभापतींनी मला लोकशाहीबद्दलची वचनबद्धता व त्यांच्याशी कसे वागावे यासंबंधी अभिव्यक्त केले. लोकांमध्ये जाणीव जागृत करण्यासाठी त्यांना एक दिवसीय उपोषण करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले


उपसभापती हरिवंश नारायण सिंह म्हणाले कि, २० सप्टेंबर २०२० रोजी राज्यसभेत जे काही झाले, त्यामुळे मागील दोन दिवसांपासून मी अतिशय मानसिक तणावात आहे. मी रात्रभर झोपू देखील शकलो नाही. उच्च सभागृहात जे काही घडले, त्यामुळे सभागृहाच्या मर्यादेचे मोठे नुकसान झाले आहे. सभागृहात सदस्यांकडून लोकशाहीच्या नावाखाली हिंसक कृत्य झाले. या ठिकाणी बसलेल्या सदस्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न झाला. उच्च सभागृहाची मर्यादा आणि व्यवस्थेचे उल्लंघन ( violated,) करण्यात आले, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच या घडामोडींमुळे हरिवंश यांनी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.