लॉकडाऊनमुळे आर्थिक डोलारा कोलमडला, ‘डिस्ने’त २८ हजार कर्मचाऱ्यांची कपात

लॉकडाऊनचा (lockdown) विपरित परिणाम पर्यटन उद्योगावरही झाला आहे. पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या डिस्ने थाम पार्कवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून वर्षानुवर्षे कार्यरत २८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोनाने आर्थिक डोलारा कोलमडल्याने डिस्ने कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  (corona virus) आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जागतिक मंदीची छटा पसरली आहे. लॉकडाऊनचा (lockdown) विपरित परिणाम पर्यटन उद्योगावरही झाला आहे. पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या डिस्ने थाम पार्कवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून वर्षानुवर्षे कार्यरत २८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोनाने आर्थिक डोलारा कोलमडल्याने डिस्ने कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडातील डिस्ने पार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांना या नोकर कपातीमध्ये आपली नोकरी गमवावी लागणार आहे. अनिश्चिततेचे सावट लॉकडाऊनचा मनोरंजन उद्योगावर झालेला प्रचंड आघात, सोशल डिस्टंसिंगची बंधने,कोरोना संकट आणखी किती काळ सुरू राहील याबाबत अनिश्चितता आणि किमान मनुष्यबळात कंपनी चालवणे यांसारख्या निर्बंधाने नोकर कपातीचा कटु निर्णय घ्यावा लागल्याचे डिस्ने पार्कचे अध्यक्ष जोश डी आमरो यांनी सांगितले.

एक तृतीयांश कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

– थीम पार्क हे जगातील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. अमेरिका फिरण्यासाठी येणारा प्रत्येक पर्यटक डिस्ने थीम पार्कला भेट दिल्याशिवाय परत जातच नाही. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी थीमपार्कला भेट देतात.

– कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या शहरातील थीम पार्कमध्ये १ लाख १० हजार कमर्चारी काम करत होते. मात्र या नोकर कपातीने येथील कर्मचाऱ्यांची संख्या ८२ हजारपर्यंत खाली आली आहे.

– अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये कोरोनाने हाहाकार उडवला होता. कोरोना बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे स्थानिक प्रश्नाने याठिकाणी टाळेबंदी घोषीत केली.

– टाळेबंदी अद्याप कायम असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता धूसर बनली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात पार्क सुरू होणे अवघड असल्याने डिस्ने कंपनी व्यवस्थपनाने नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला.