गगनाला भिडलेले खाद्य तेलाच्या भाव कमी करण्यासाठी मोदी सरकार उचणार ‘हे’ पाऊल

देशात गेल्या एक वर्षात सोयाबिन तेल आणि पाम तेलाच्या किंमती दुप्पट झाल्यात. भारत सध्या दोन तृतीयांश तेलाची गरज आयात करुन पूर्ण करत आहे. सध्या पाम तेलावर ३२.५ टक्के आणि कच्च्या सोयाबीन आणि सोयाबीन तेलावर ३५ टक्के कर आकारला जात आहे.

    नवी दिल्ली: एकीकडे कोरोनाचे संकट सातत्याने डोके वर काढत असतानाच दुसरीकडे मात्र वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल , डिझेलसह खाद्य तेलांचा किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. यावर तोडगाम्हणून केंद्र सरकारकडून खाद्य तेल आयात कमी करण्याची तयारी सुरु झाली आहे. यामुळे देशात खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. देशात सध्या मोहरीचे तेल, पाम तेल, सोया तेलांच्या १ लीटरच्या किंमत सुमारे १७५ ते २०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. यातून सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार कर कमी करण्याची तयारी सुरु करत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या भारत जगातील सर्वात जास्त तेलाची आयात करणारा देश आहे.

    आयात कमी केल्याने किंमती होतील कमी

    आयात कर कमी केल्याने देशांतर्गत खाद्य तेलाचे दर कमी होतील आणि वापर वाढेल. यामुळे मलेशियामधून आयात केलेले पाम तेल, सोया तेल, सूर्यफूल तेलाच्या आयातीला आधार मिळेल आणि देशातील मोहरी, सोयाबिन आणि शेंगदाणा तेलाच्या किंमतीही कमी होतील. खाद्यतेलांवरील आयात कर कमी करण्याच्या प्रस्तावावर केंद्राचा विचार सुरू आहे. या महिन्यात या संदर्भात निर्णय घेता येईल. असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

    एका वर्षात दुप्पट किंमत

    देशात गेल्या एक वर्षात सोयाबिन तेल आणि पाम तेलाच्या किंमती दुप्पट झाल्यात. भारत सध्या दोन तृतीयांश तेलाची गरज आयात करुन पूर्ण करत आहे. सध्या पाम तेलावर ३२.५ टक्के आणि कच्च्या सोयाबीन आणि सोयाबीन तेलावर ३५ टक्के कर आकारला जात आहे. पाम तेल प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया सेस आणि सोयाबीन तेल अर्जेंटिना, ब्राझील, युक्रेन आणि रशिया आयात केले जाते.