The mother of Chief Justice Sharad Bobade was cheated of Rs 2.5 crore and the couple was handcuffed

बोबडे कुटुंबीयांची आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या जमीनीवर सीजन लॉन तयार करण्यात आला आहे. लॉनची मालकी शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांच्याकडे आहे. हा लॉन आरोपी तापस घोष गेल्या १० वर्षांपासून चावत आहे.

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे ( Chief Justice Sharad Bobade ) यांच्या आईची  (mother ) अडीच कोटी रुपयांची फसवणूक (cheated of Rs 2.5 crore ) केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी आरोपी तापस घोष यावर कारवाई करत अटक केली आहे. ही कारवाई रात्री उशीरा करण्यात आली.

माहितीनुसार, बोबडे कुटुंबीयांची आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या जमीनीवर सीजन लॉन तयार करण्यात आला आहे. लॉनची मालकी शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांच्याकडे आहे. हा लॉन आरोपी तापस घोष गेल्या १० वर्षांपासून चावत आहे. त्यामुळे ह्या लॉनच्या आर्थिक व्यवहार तापस घोष आणि त्याची पत्नी पाहत होती. शरद बोबडेंच्या आई मुक्ता बोबडे वयोवृद्ध आणि आजारी असल्यामुळे त्यांचा गैरफायदा घेत घोष यांनी भाडेपोटी वसूल करत असलेल्या रक्कमेत हेराफेरी केली.

तापस घोषणे आर्थिक व्यवहारात बानवट पावत्या करुन मोठी रक्कम हडप केली. मागील काही वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. परंतु सदर प्रकार बोबडे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिस स्थानकात धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्याकडे या प्रकरणी तक्रार केली गेली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी तापस घोषला अटक करण्यात आली आहे.