The second wave is worse than the first: when the little ones are vaccinated; If you want to keep children away from the corona ...

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मते, कोरोनाची नेझल व्हॅक्सिन अर्थात नाकावाटे दिली जाणारी लस लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. अशी माहिती समोर आली आहे की ही लस इतर लशींपेक्षा अधिक फायदेशीर ठरणारी असेल. शिवाय ही लस घेणेदेखील सोपे आहे.

    दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचे संकट सर्वांसमोर उभे ठाकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या सर्वात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

    जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मते, कोरोनाची नेझल व्हॅक्सिन अर्थात नाकावाटे दिली जाणारी लस लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. अशी माहिती समोर आली आहे की ही लस इतर लशींपेक्षा अधिक फायदेशीर ठरणारी असेल. शिवाय ही लस घेणेदेखील सोपे आहे.

    मोठ्या प्रमाणात शालेय शिक्षकांनी लस घेणे आवश्यक आहे. जेव्हा मुलांमध्ये कोरोना विषाणू प्रसारित होण्याचा धोका कमी होईल तेव्हाच मुलांना शाळेत पाठवावे. भारतात बनलेली नेझल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. मुलांना ही लस देणे सोपे आहे.

    शिवाय ही रेस्पिरेटरी ट्र्रॅकमध्ये प्रतिकारशक्ती वाढवेल, असे स्वामीनाथन यांनी सांगितले. उल्लेखनीय आहे की, हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने नेझल व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. या लसीद्वारे नाकातून डोस दिले जातील. कंपनीच्या मते नेझल स्प्रेचे केवळ 4 थेंब पुरेसे असतील. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन-दोन थेंब टाकले जातील.