कोरोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीमध्ये जवळपास ८५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १ ते १० वर्षांच्या मुलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण ३.२८ टक्के इतकं होतं. तर दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ३.०५ टक्के इतकं आढळून आलं आहे. याशिवाय ११ ते २० वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण ८.०३ टक्के इतकं होतं. तर दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ८.०५ इतकं आहे.

    नवी दिल्ली: देशातले कोरोना रुग्णवाढीची संख्या रोडावली असली तरी देशात सध्या जवळपास ९ लाख सक्रिय रुग्ण असून २० राज्यांमध्ये सध्या ५ हजाराहून कमी सक्रिय रुग्ण आहेत, मात्र यासोबत कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १ लाख १७ हजार ५२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
    “कोरोना विषाणूचा नवा व्हेरिअंट २०२० सालच्या व्हेरिअंटपेक्षा खूप चलाख झाला आहे. त्यामुळे आपल्याला आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. जास्तीत जास्त सोशल डिस्टन्सिंगचं पालन आपल्याला करावं लागणार आहे. मास्कचा जास्तीत जास्त वापर करावा लागणार आहे. नाहीतर परिस्थिती पुन्हा एकदा बिघडू शकते”, असा इशारा नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी दिला आहे.

    कोरोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीमध्ये जवळपास ८५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १ ते १० वर्षांच्या मुलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण ३.२८ टक्के इतकं होतं. तर दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ३.०५ टक्के इतकं आढळून आलं आहे. याशिवाय ११ ते २० वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण ८.०३ टक्के इतकं होतं. तर दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण ८.०५ इतकं आहे.

    कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण हे मोठं अस्त्र असल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलं. देशातील प्रत्येक नागरिकानं मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं या कोरोना संबंधिच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करतो, असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. यासोबत लांबचा प्रवास टाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला आहे.