रवि शंकर प्रसाद आणि शशी थरूर यांची ट्विटर खाती काही कालावधीसाठी लॉक करण्यात आली ? संसदीय समितीने ट्विटरकडे मागितला जबाब

शशी थरूर आणि रवि शंकर प्रसाद यांची खाती का लॉक करण्यात आली होती, अशी विचारण करत समितीने ४८ तासांत उत्तर देण्यास सांगितलं. आहे. भारतात तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्यावरून ट्विटर आणि केंद्र सरकार आमने-सामने आले होते.

    गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. भारतात तक्रार निवारण अधिकारी नेमण्यावरून हा संघर्ष उभा ठाकला होता. ट्विटरने अधिकारी नियुक्त केला आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान ट्विटरकडून केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची ट्विटर खाती काही कालावधीसाठी लॉक करण्यात आली होती.

    याबद्दल माहिती-तंत्रज्ञान संसदीय समितीने ट्विटरला जाब विचारला आहे. शशी थरूर आणि रवि शंकर प्रसाद यांची खाती का लॉक करण्यात आली होती, अशी विचारण करत समितीने ४८ तासांत उत्तर देण्यास सांगितलं. आहे. भारतात तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्यावरून ट्विटर आणि केंद्र सरकार आमने-सामने आले होते.

    केंद्राने निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर ट्विटरने भारतात तक्रार निवारण अधिकरी नियुक्त केला. मात्र, त्यानंतरही केंद्र आणि ट्विटर यांच्यातील कलगीतुरा सुरूच असल्याचं चित्र आहे. २५ जून रोजी ट्विटरने केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांच्यासह काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांचं ट्विटर खाते काही कालावधीसाठी लॉक केलं होतं.