The phoenix boom of the economy; 20.1 per cent growth in April-June quarter

गेल्या वर्षी कोरोनाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. विकास दराने ऐतिहासिक उणे 24.4 टक्के इतका दर नोंदवला होता. त्याची जवळपास भरपाई करण्यात सरकारला यश आले आहे. पहिल्या तिमाहीत जीडीपी दर 20.1 टक्के इतका वाढला आहे.

    दिल्ली : गेल्या दीड-दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने पुन्हा फिनिक्स भरारी घेतली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास दर (जीडीपी) 20.1 टक्के नोंदवला आहे. केंद्र सरकारकडून मंगळवारी पहिल्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर करण्यात आली.

    गेल्या वर्षी कोरोनाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. विकास दराने ऐतिहासिक उणे 24.4 टक्के इतका दर नोंदवला होता. त्याची जवळपास भरपाई करण्यात सरकारला यश आले आहे. पहिल्या तिमाहीत जीडीपी दर 20.1 टक्के इतका वाढला आहे.

    गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या आणि अखेरच्या तिमाहीत जीडीपी दर 1.6 टक्के नोंदवण्यात आला होता. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बहुतांश राज्यांनी निर्बंध टप्याटप्यात शिथिल केले होते. बाजारपेठा पूर्वपदावर आल्याने कर संकलनात देखील मोठी वाढ झाली होती. पहिल्या तिमाहीत बांधकाम क्षेत्राची सर्वाधिक 68.3 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.

    त्याखालोखाल कारखाना उत्पादन क्षेत्राचा 49.6 टक्के वृद्धी दर नोंदवण्यात आला. पहिल्या तिमाहीत खाणकाम क्षेत्राने देखील दमदार कामगिरी करत 18.6 टक्के वृद्धी दर प्राप्त केला आहे. याशिवाय आठ प्रमुख क्षेत्राच्या कामगिरी देखील प्रचंड सुधारणा झाली आहे.