तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने चिंता वाढली! कोरोनाबाधित नव्या रुग्णसंख्येत ३२ टक्क्यांची वाढ

आठ आठवड्यांच्या तुलनेत मागील आठवड्यात रुग्णसंख्या सर्वाधिक वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या रुग्णसंख्येपैकी दक्षिण भारतातील रुग्ण सर्वाधिक आहे. मागील आठवड्यात देशात 2.9 लाख कोरोना रुग्ण आढळून आले.

  दिल्ली (Delhi) : कोरोनाची दुसरी लाट (the second wave of corona) संथ होताच अनेक ठिकाणी निर्बंध (Restrictions) शिथील (slow down) करण्यात आले असून सार्वजनिक स्थळी (public places) सणासुदीच्या काळामुळे (the festive season) वर्दळही वाढली आहे. याचाच परिणाम कोरोना रुग्णसंख्येवरही झाला आहे. आठवडाभरात देशातील एकूण रुग्णसंख्येत 32% वाढ झाल्याचे निदर्शनास आले असून गेल्या 24 तासात 43 हजार रुग्णही आढळले आहेत.

  दक्षिण भारतातील रुग्णसंख्या अधिक (More patients in South India)
  गेल्या आठ आठवड्यांच्या तुलनेत मागील आठवड्यात रुग्णसंख्या सर्वाधिक वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या रुग्णसंख्येपैकी दक्षिण भारतातील रुग्ण सर्वाधिक आहे. मागील आठवड्यात देशात 2.9 लाख कोरोना रुग्ण आढळून आले. ही संख्या त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत 32 टक्के जास्त आहे.
  ————
  (इन्फो)
  महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

  रुग्णसंख्या         राज्य 

  29,836 ——– केरळ
  4,066  ——–  महाराष्ट्र
  1,557  ——–   आंध्रप्रदेश
  1,538  ——–   तामिळनाडू
  1,262  ——–   कर्नाटक
  (24 तासांतील रुग्णसंख्या)
  ———————————-
  रुग्णसंख्या                    स्थिती 
  3,27,37,939  ——–  एकूण कोरोनाबाधित
  42,909          ——–   नवे
  3,19,23,405 ——–   एकूण बाधामुक्त
  34,763          ——–   नवे

  4,38,210      ——–  एकूण मृत्यू
  380              ——–  नवे

  3,76,324      ——–  सक्रीय
  7,766            ——–  नवे
  ——————————-

  A-Y विषाणुचा नवा अवतार (A new incarnation of the A-Y virus)
  कोरोनाच्या डेल्टा व डेल्टा प्लस प्रकाराने जगभरात खळबळ उडविलेली असतानाच आता नवा AY-12 प्रकाराचा विषाणू शास्त्रज्ञांना सापडला आहे. यामुळेही चिंता वाढली आहे. हा डेल्टा प्रकाराचा विषाणू असल्याचेच शास्त्रज्ञांना वाटत होते; मात्र हा एवाय- 12 प्रकारातला विषाणू असल्याचे समोर आले आहे.

  देशभरातील प्रयोगशाळांना यानंतर सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. संक्रमित सॅम्पसच्या जिनोम सिक्‍वेन्सिंग दरम्यान एवाय-12 म्युटेशनवर जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रयोगशाळांना सांगण्यात आले आहे. जिनोम सिक्‍वेन्सिंगवर लक्ष ठेवणार्‍या इन्साकॉगने देखील सर्व प्रयोगशाळांसाठी अ‍ॅलर्ट जारी केला आहे.