देशातील दुसरी लाट आता काही प्रमाणात आटोक्यात आली आहे, मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता ; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा

मागील दोन आठवड्यात आफ्रिकेतील मृत्यूचा दर ३०-४० टक्क्यांनी वाढला आहे. तर मागील २४ तासात पाच लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९ हजार ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. ही काही कोरोना आटोक्यात आल्याची चिन्हं नाहीत, असं स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे.

    देशातील कोरोनाची दुसरी लाट आता काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना संदर्भात इशारा दिला आहे.

    अनेक देशांनी कोरोना रुग्णसंख्या कमी होताच नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. मात्र कोरोना संपला नाही, त्याचा वेगही कमी झालेला नाही, असं सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.