दिल्लीत अनलॉक-६ च्या प्रक्रियेला सुरूवात, स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्पलेक्स सुरू होणार ; पण शाळा आणि महाविद्यालयांचं काय ?

दिल्लीमध्ये आज रविवारी अनलॉक-६च्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आली आहे. यामध्ये काही गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर काही गोष्टी या बंदच राहणार आहेत. 

  दिल्लीमध्ये आज रविवारी अनलॉक-६च्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आली आहे. यामध्ये काही गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर काही गोष्टी या बंदच राहणार आहेत.  स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्पलेक्स या गोष्टी सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. परंतु सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्स, ऑडीटोरियम आणि शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाहीये.

  दिल्लीमध्ये या गोष्टींना दिली सूट – 

  १) योगा सेंटर आणि जिम ५० टक्के क्षमतेसोबत सुरू राहणार आहे.

  २) लग्न समारंभात ५० लोकांनाच परवानगी दिली आहे.

  ३) सरकारी ऑफिस, ऑटोनॉमस बॉडी, पीएसयू आणि कॉर्पोरेशनला १०० टक्के स्टाफना परवानगी दिली आहे.

  ४) खासगी कार्यालये सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. पण यामध्ये ५०टक्के इतक्याच स्टाफना परवागनी देण्यात आली आहे.

  ५) दुकाने, रेसिडेंस कॉम्पलेक्स आणि रेशन दुकाने सकाली १० ते संध्याकाळी ८ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे.

  ६) अनुमती प्राप्त आठवडे बाजारास ५० टक्के सुरू करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. तसेच स्टेडियम आणि कॉम्पलेक्स सुद्धा सुरू राहणार आहेत.

  कोणत्या गोष्टी बंद राहणार –

  १) शाळा, कॉलेड, शिक्षण संस्था, ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस आणि इंस्टिट्यूट

  २) सामाजिक , राजकीय, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम

  ३) स्विमिंग पूल, सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, ऑडिटोरियम, असेंबली