राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपाच्या भविष्याची चिंता, प्रतिमा सुधारण्याच्या रणनीतीसाठी मोदी-शाहांसोबत झाली बैठक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांतील पराभव (The defeat in the West Bengal Assembly elections), देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश (the failure to deal with the Corona situation), आर्थिक आघाडीवर आलेले अपयश (the failure on the economic front) या सर्व मुद्द्यांनी केंद्रातील भाजपा सरकराची प्रतिमा काळवंडली आहे.

  दिल्ली (Delhi).  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांतील पराभव (The defeat in the West Bengal Assembly elections), देशातील कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश (the failure to deal with the Corona situation), आर्थिक आघाडीवर आलेले अपयश (the failure on the economic front) या सर्व मुद्द्यांनी केंद्रातील भाजपा सरकराची प्रतिमा काळवंडली आहे. अशा स्थितीत पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांबाबत (the Uttar Pradesh Assembly elections) रा. स्व. संघ काळजीत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी संघाचे प्रमुख पदाधिकारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत एक बैठक पार पडल्याची माहिती आहे.

  उत्तर प्रदेशातील कोरोनाची स्थिती आणि त्याचा निवडणुकीवर होणारा परिणाम याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. दिल्लीत पार पडलेल्या या महत्तवपूर्ण बैठकीनंतर, पक्ष आणि संघटनातमक पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या प्रतिमेवर गेल्या काही दिवसांपासून झालेली नुकसान भरपाई व्हावी आणि उ. प्रदेश विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम राहू नये, यासाठी काळजी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येते आहे.

  मोदींवर थेट हल्ले, भाजपासाठी चिंतेची बाब
  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका होत असल्याने भाजपाची चिंता वाढली आहे. दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेचे अपयश जनतेसमोर आले आहे. ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा, औषधांचा तुटवडा आणि लसीकरणाच्या घोषणेनंतरही त्याचा मंदावलेला वेग, यामुळे केंद्र आणि राज्य सरकारे अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

  गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांनी योगी सरकार अडचणीत
  कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये उ. प्रदेशचा समावेश आहे. गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांनी, उ. प्रदेशात होणाऱ्या मृत्यूचे सत्यच देशासमोर आले आहे. कोरोनाची स्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात योगी सरकार अपयशी ठरल्याची टीकाही होते आहे. उ. प्रदेशात होणाऱ्या चाचण्या आणि सरकार देत असलेले रुग्णांचे आकडे हेही वादात सापडलेले आहेत, सरकारकडून देण्यात येणारी माहिती किती खरी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.

  येत्या रविवारी मोदी सरकारला ७ वर्षे पूर्म होत आहेत, मात्र देशातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता, कोणताही कार्यक्रम करु नये असे आवाहन जे पी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. या दिवशी जास्तीत जास्त समाजसेवा करण्याचे आवाहनही एका पत्राद्वारे करण्यात आले आहे.