भारतीय सैन्याच्या बँडची ट्यून बदलणार, हे आहे खरं कारण

सध्या वाजवल्या जाणाऱ्या अनेक धून या इंग्रजांच्या काळातील आहेत. यातील अनेक धून या भारतीय सैन्याच्या आणि नागरिकांच्याही मेंदूमध्ये पक्क्या बसल्या आहेत. काही विशिष्ट प्रसंगातच या धून वाजवल्या जातात आणि त्या ऐकल्या की भारतीयांना स्फुरण चढतं. ओल्ड लँग सिने ही धून तर सर्व परेडमध्ये ऐकायला मिळते, तर 'अबाईड विथ मी' ही धून रिट्रीट सोहळ्याची ओळख पटवून देते. 

    भारताचं सैन्यदल (Military) अनेक जुन्या परंपरा बदलण्याच्या विचारात आहे. या परंपरांची उगमस्थानं आणि त्यामागचे संदर्भ यांचा विचार करून काही गोष्टी बदलण्याचा विचार सध्या सुरू आहे. यामध्ये गेल्या काही दशकांपासून वाजवल्या जाणाऱ्या बँड धून, सैन्य पुरस्कारावेळी वाजवल्या जाणाऱ्या धून आणि मेसमधील धून यांचा समावेश आहे.

    बदलण्याचं खरं कारण

    सध्या वाजवल्या जाणाऱ्या अनेक धून या इंग्रजांच्या काळातील आहेत. यातील अनेक धून या भारतीय सैन्याच्या आणि नागरिकांच्याही मेंदूमध्ये पक्क्या बसल्या आहेत. काही विशिष्ट प्रसंगातच या धून वाजवल्या जातात आणि त्या ऐकल्या की भारतीयांना स्फुरण चढतं. ओल्ड लँग सिने ही धून तर सर्व परेडमध्ये ऐकायला मिळते, तर ‘अबाईड विथ मी’ ही धून रिट्रीट सोहळ्याची ओळख पटवून देते.

    धून बदलण्याचा हा विचार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. भारतीय सैन्याच्या धून या भारतात तयार झालेल्या आणि भारतीयांनी तयार केलेल्या असाव्यात, हा त्यामागचा उद्देश. यासाठी योग्य धून शोधण्याचं काम अगोदरच सुरू करण्यात आलंय. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनी या धूनचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

    ब्रिटीशांच्या काळात सुरु असलेल्या अनेक सैनिकी परंपरा आणि सोहळे हे यापुढे सुरू ठेवायचे की नाही, याचाही विचार सुरू आहे. जुनै सैन्य पुरस्कार हे भारतीय राज्यांविरोधात शौर्य दाखवणाऱ्या ब्रिटीश सैनिकांना दिले जायचे. ब्रिटीशांच्या काळातील मेसच्या प्रक्रियाही आता बदलल्या आहेत. त्यामुळे या परंपरांचा पुनर्विचार सध्या केला जातोय.